NCP Ajit Pawar Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये पुन्हा एक धक्का, डॉ. झाकीर शेख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश!

Dr Zakir Shaikh Joins Ajit Pawar’s NCP Major Setback for Sharad Pawar in Nashik: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या निवडणुकीसाठीच्या नऊ नेत्यांच्या सुकाणू समितीत डॉ. झाकीर शेख यांचा समावेष.
Ajit Pawar, Manikrao Kokate with Dr Zakir Shaikh
Ajit Pawar, Manikrao Kokate with Dr Zakir ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Zakir Shaikh joined Ajit Pawar NCP: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांत इनकमिंग, आऊटगोईंग सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रदिर्घ काळानंतर अजित पवार पक्ष सक्रीय झाल्याचे दिसले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा प्रदेश स्तरावरील नेता उपमुख्यमंत्री पवार यांच्या गळाला लागला आहे. मंगळवारी मुंबई कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमदार हिरामण खोसकर, यांसह नाशिकचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने यानिमित्ताने महापालिका निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नऊ जणांची समिती नियुक्त केली.

Ajit Pawar, Manikrao Kokate with Dr Zakir Shaikh
Shivsena- BJP Politics: मनमाड, पिंपळनेर नगरपालिका निवडणुकीत आला अडथळा, ‘हे’ घडले कारण!

महापालिका निवडणूक समितीत माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, डॉ. श्रीमती हेमलता पाटील, माजी नगरसेवक नाना महाले, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, अनिल चौघुले आणि डॉ. शेख यांचा या समितीत समावेष आहे.

Ajit Pawar, Manikrao Kokate with Dr Zakir Shaikh
Sinnar Politics: एकनाथ शिंदे, गिरीश महाजन सिन्नरचा फड गाजवून गेले, माणिकराव कोकाटे घरच्या मैदानात केव्हा उतरणार?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हंड्रेड प्लसची घोषणा केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या विविध नेते व माजी नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

भाजपच्या या तयारीला आव्हान देत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष देखील सक्रीय आहे. त्यांनी नुकतेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या ऐवजी आमदार सुहास कांदे यांचा समावेष असलेली वॉर रूम निर्माण केली आहे. शिवसेना शिंदे पक्ष स्वबळाची चाचपणी करीत आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष देखील सक्रीय झाला आहे. डॉ. शेख यांच्या निमित्ताने अल्पसंख्यांक चेहरा पक्षाला मिळाला आहे. त्यादृष्टीने महापालिका निवडणूक मोठे उद्दीष्ट असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com