Nashik land scam News: गेल्या महिन्यात नाशिकमध्ये मोठा जमीन घोटाळा चर्चेत आला. त्यामध्ये १४ मोठ्या नावाजलेल्या बांधकाम व्यवसायिकांसह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या घोटाळ्याचा तपास मात्र पुढे सरकलेला नाही. त्यामुळे एका बहुचर्चीत घोटाळ्याच्या तपासाबाबत उत्सुकता कायम आहे.
शहरातील नाशिक डायओसेशन ट्रस्ट या ख्रिस्ती समाजाच्या संस्थेच्या जमिनीचा घोटाळा गेली काही वर्ष सुरू आहे. यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयाची भाडेतत्त्वावरील जमीनही समाविष्ट आहे. हे कार्यालयच हडप करण्याचा प्रयत्न गेल्या महिन्यात झाल्याची तक्रार आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये नाशिक डायओसेशन ट्रस्ट या मूळ संस्थेच्या नाम साधर्म्य असलेला ट्रस्ट मुंबईत नोंदणी करण्यात आला. या ट्रस्ट द्वारे ३०० कोटींच्या जमिनींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारीत आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाची जुनी इमारत आणि कार्यालय असलेले जागा याच ट्रस्ट कडून गृह विभागाने भाड्याने घेतली आहे. ही भाडेतत्त्वावरील जमीन थेट बांधकाम व्यवसायिकांना विक्री करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्थ बलकुंदी आणि त्यांच्या १५ सहकारी विश्वस्तांनी हे काम केले. त्यात बांधकाम व्यावसायिकांनी एकमेकांना सोयीचे व्यवहार करून मोठा घोटाळा केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता.
एवढा मोठा घोटाळा आणि तो देखील पोलिसांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र यातील गुन्हा दाखल झालेले १४ बांधकाम व्यवसायिक यापैकी एकालाही अद्यापही अटक झालेली नाही. काही बांधकाम व्यवसायिकांनी तातडीने न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला होता.
या संदर्भात तपास अधिकाऱ्यांची संपर्क केला असता, हा तांत्रिक गुन्हा असल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात न्यायालयाकडून सुनावणी झाल्यानंतर संबंधित विभागांच्या भूमिकेवर पुढील कार्यवाही अवलंबून आहे. त्यामुळे अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही असे सांगण्यात आले.
नाशिक शहरातील गुन्हा दाखल झालेला हा ३०० कोटींचा घोटाळा वर मोठा वाटत आहे. मात्र संबंधित ट्रस्ट कडून गेले वीस वर्ष येथील ख्रिस्ती समाजाच्या पुनर्वसनासाठी असलेल्या जमिनींची सर्रास विक्री सुरू आहे. जमिनींवर मोठे टॉवर देखील उभे राहिले आहेत. अनेक राजकीय नेते तसेच लोकप्रतिनिधींनी येथे जमिनी विकसित केले आहे. शहरातील प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिकांनी त्यात मोठी कमाई केली आहे. यातील दोषींवर पोलिसांचा बडगा उगारला जाणार की नाही याची चर्चा सुरू आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.