Nashik Ganesh Visarjan: पोलीस आयुक्तांची शिस्तीची सक्ती, मध्यरात्री बाराच्या ठोक्याला थांबला डीजेचा दणदणाट!

Nashik Politics; Police discipline restrained the procession, DJ's noise stopped at midnight -रिमझिम पावसाच्या सरींच्या साक्षीने मध्यरात्रीपर्यंत नाशिकच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक
Girish Mahajan & Sandeep Karnik
Girish Mahajan & Sandeep KarnikSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिकच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक मध्यरात्री तीन पर्यंत सुरू होती. मिरवणुकीतील सर्व पंचवीस गणेश मंडळांनी उत्साहात गणेश विसर्जन केले. यामध्ये पोलीस आयुक्तांनी थेट मिरवणुकीत उतरून कार्यकर्त्यांना शिस्त लावली.

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत गणेश भक्तांच्या उत्साहावर त्याचे विरंजन पडले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, यांच्या उपस्थितीत दुपारी बाराला पारंपारिक वाकडी बारावी येथून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ झाला.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत रात्री बारा नंतर डीजे वाजविण्यास परवानगी नाकारली. यावरून मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसात वादविवाद सुरू होता. मात्र लवकर मिरवणुकीला सुरुवात करून लवकर मिरवणूक संपवावी यावर यंत्रणा ठाम राहिल्या.

Girish Mahajan & Sandeep Karnik
Rajabhau Vaje Politics: कुंभमेळा ठराविक नेते अन् सत्ताधारी मंत्र्यांचाच आहे का? खासदार राजाभाऊ वाजे यांचा प्रश्न!

मध्यरात्री बाराला प्रमुख मंडळे महात्मा गांधी रोड परिसरात असतानाच पोलिसांनी सक्तीने डीजे बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर पारंपारिक वाद्यांनी मिरवणूक पुढे सरकली. मध्यरात्री दोनला मिरवणुकीतील शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. यंदा पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या शिस्तीचे दर्शन घडले.

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमणाऱ्या नाशिक शहरात आज आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या भव्य विसर्जन मिरवणुकांनी वातावरणात उत्साह आणि भक्तीचे रंग भरले होते. या पार्श्वभूमीवर, नाशिककरांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी नाशिककरांना आश्वस्त केले होते की, डीजे बंद झाल्यानंतर मिरवणुकीचा उत्साह कमी होणार नाही. पारंपरिक वाद्यांना कोणतीही बंदी नसेल. ढोल-ताशे, हलगी, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक मध्यरात्रीनंतरही सुरू ठेवण्यास पूर्ण परवानगी असेल. यामुळे नाशिकच्या गणेशोत्सवाची परंपरा जपली जाईल आणि उत्सवाचा जल्लोषही कायम राहील.

यावेळी श्री. कर्णिक यांनी सर्व गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि भाविकांनी दाखवलेल्या शिस्तबद्ध सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले, "नाशिककरांनी नेहमीच सण-उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरे करण्याची परंपरा जपली आहे. याहीवर्षी आपण सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करायचा आहे."

एकंदरीत, नाशिकचा हा विसर्जन सोहळा म्हणजे उत्साह, परंपरा आणि शिस्त यांचा एक सुंदर मिलाफ ठरत आहे. प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करत, परंपरेचा मान राखत आपला उत्सव साजरा झाला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com