आता काँग्रेस लहान भाऊ आहे, आपण मोठा भाऊ आहोत!

लहान-मोठा असं काही नसतं, आपल्याला एकमेकांच्या सोबतीने काम करायचे आहे, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

नाशिक : 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा' नाशिक (Nashik)जिल्ह्यात दाखल झाली आहे. येवला, निफाड, सिन्नर या मतदारसंघासह देवळाली विधानसभा मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.

''भविष्यात शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत मिळून काम करायचे आहे. मागच्या वेळी काँग्रेस हा मोठा भाऊ होता आणि आपण लहान होतो. यावेळी मात्र काँग्रेस लहान भाऊ आहे आणि आपण मोठा भाऊ आहोत. परंतु लहान-मोठा असं काही नसतं, आपल्याला एकमेकांच्या सोबतीने काम करायचे आहे, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५४ जागा मिळवल्या म्हणजे आभाळाला हात लागले असे नाही. यासाठी अधिक नेटकेपणे पक्ष चालवण्याची गरज आहे. आपल्याला पक्षाची प्रगती करायची असेल तर आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा झंझावात बोलून चालणार नाही, तर त्यांचे विचार, पक्षाची ध्येय-धोरणे समाजात रुजवण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. दिलीप बनकर यांना ज्या उत्साहाने निवडून आणले त्याच उत्साहाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही यश मिळवा,'' असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

Jayant Patil
नाथाभाऊ, शूटर लावून मला मारून टाका : चंद्रकांत पाटील

आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आपले विचार यावेळी मांडले. यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे,तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, प्रदेश सरचिटणीस सागर पाटील कुंदे, महिला तालुकाध्यक्षा सुनिता राजोळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष महेश कुटे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून १३९ मतदारसंघात आतापर्यंत जाता आले. जे जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, ते पुढच्या वेळी शंभर टक्के निवडून आलेच पाहिजेत. शिवाय ज्या मतदारसंघात पराभव झाला आहे त्या मतदारसंघात पुन्हा उभारी कशी घेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आढावा बैठकीत जयंत पाटील यांनी सांगितले. या बैठकीस पक्षाचे कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंतजी टकले, देवळालीच्या आमदार सरोजताई अहिरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, जिल्हा उपाध्यक्षा मिनाक्षी काकळीज, जिल्हा युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, युवती जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, महिला तालुका अध्यक्ष शितल भोर, युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com