Shivsena Politics: उद्धव ठाकरे वृक्षतोडीवर बोलले...अन् शिवसैनिकांनी तपोवनात धाव घेतली, म्हणाले, प्रशासनाला ठणकावले, “ हा तर नाशिकचं फुफ्फुस गिळंकृत करण्याचा कट”

Nashik-Shivsena-Uddhav-Thackerey-agitation-Tapovana- against-BJP-Leader-Girish-Mahajan-NMC-Tree-Cutting-for-Sadhugram-गिरीश महाजनांच्या वृक्षतोडीच्या हट्टाने शिवसेनेला महापालिका निवडणुकीसाठी मिळाला आयता राजकीय मुद्दा
Uddhav-Thackrey
Uddhav-ThackreySarkarnama
Published on
Updated on

Shivsena Tree Cutting agitation News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील वृक्षतोडीबाबत राज्य शासनाला इशारा दिला होता. राज्य शासनाचा पर्यावरणविरोधी एजेंडा धोकादायक आहे. कुंभमेळा साजरा करण्यासाठी झाडे तोडण्याची गरजच काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

तपोवनातील सतराशे झाडे तोडण्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाला इशारा देण्यात आला. साधू-संतांची परंपरा असलेल्या तपोवनातील झाडे तोडू नये, असा इशारा देण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे झाडे तोडण्याबाबतचे वर्तन आधीच सर्व ठरल्यासारखे वाटते. त्यांनी झाडे तोडण्याचा निर्णय आधीच निश्चित केलेला दिसतो. नागरिकांमध्ये तशी भावना निर्माण झालेली आहे, हे कदापी होऊ दिले जाणार नाही.

Uddhav-Thackrey
Ajit Pawar NCP Vs BJP : नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली; अजितदादांचा शिलेदार संतापला, निषेधाबरोबरच भाजपला 'खोडा पार्टी' म्हटलं!

यावेळी तपोवनात जमलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी झाडे वाचविण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या. महापालिकेचा निर्णय म्हणजे तपोवनातील झाडांचे “मृत्यूपत्र” लिहिण्याचा प्रकार आहे. त्याला राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे.

Uddhav-Thackrey
Kumbh Mela Politics: हट्टच न सोडणाऱ्या महाजनांशी लढण्यासाठी शंकराचार्य आणि साधुसंतही उतरले तपोवनात! खडे बोल सुनावत म्हणाले, झाडे तोडून कसले कुंभ स्नान....

नाशिककरांना हा निर्णय कदापी मान्य होणार नाही, असा ठाम सूर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी, शिवसेना कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते. झाडांचे छायाचित्र, मृत्युपत्र, आणि निषेध फलक हातात घेऊन बैठक व आंदोलन झाले.

झाडे वाचविणे हा फक्त नाशिक शहराच्या पर्यावरणाचाच विषय नाही. हा धर्म, संस्कृती आणि नाशिकच्या अस्तित्वाचा आहे. राज्यातील सरकार जनतेच्या भावनांचा अनादर करून झाडे तोडू इच्छीते. हे कदापी होऊ दिले जाणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कुंभमेळ्याचे नाव पुढे करून सरकार झाडे तोडू इच्छीते. प्रत्यक्षात यामध्ये मोठा डाव आहे. ज्या तपोवनात साधू-संतांनी वास्तव्य केले, ती झाडे तोडून टाकायची. नंतर ती जमीन २२० कोटींना कंत्राटदारांना देण्याचा डाव आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, जिल्हा सचिव मसूद जिलानी, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, उपजिल्हाप्रमुख दिलीप मोरे स्वातीताई पाटील, बाळासाहेब कोकणे यांसह विविध नेते आंदोलनात सहभागी झाले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com