माणिकराव कोकाटे म्हणाले, `२५ वर्षांनंतर कोण जीवंत राहणार आहे?`

नाशिक कारखाना सुरु करण्याचे आव्हान व समस्या संपल्या असे समजू नका.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama

नाशिक : कारखाना (Nashik Sugar factory) सुरु करण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली. मात्र व्यासपीठावरील व समोरच्या निम्म्या लोकांकडे ऊसाचे (Sugarcane) टिपरूही नाही हे लक्षात ठेवा. हा कारखाना सुरु करण्यातील अडचणी अद्याप संपलेल्या नाही. कारण पुढच्या पंचवीस वर्षात माझ्यासह यातील कोण जीवंत राहील हे सांगता येणार नाही, असे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले.

Manikrao Kokate
दीपक पांडे सामान्यांच्या नजरेत हिरो ठरले?

नाशिक साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोजताई अहिरे, आमदार हिरामण खोसकर, कंत्राटदार दीपक चंदे, युवराज शहाजीराजे आदींसह विविध नेते उपस्थित होते.

Manikrao Kokate
माझे विरोधक टक्केखोर, दलाल त्यांना लाजच नाही!

आमदार कोकाटे म्हणाले, हा कारखाना सुरु झाला, त्यासाठी दोन व्यक्तींना धन्यवाद दिले पाहिजे. या कारखान्यासाठी ज्यांनी पुंजी लावण्याचा निर्णय घेतला ते दीपक चंदे आणि युवराज शहाजीराजे. त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे आणि आमदार सरोजताई अहिरे यांचे. त्यांनी आपल्या परीने कारखाना सुरु व्हावा यासाठी अतिशय मनापासून परिश्रम घेतले. कारखाना सुरु व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी दोन मोठ्या लोकांना एकत्र आणले आणि कारखाना सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला.

ते पुढे म्हणाले, नाशिक साखर कारखान्याबाबत जिल्हा बँकेने सात वेळा निविदा काढल्या. आमच्या कारकिर्दीत तीन-चार वेळा निविदा निघाल्या. त्यानंतर एक दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. कंत्राटदार व्यवस्थीत येत नव्हता. कंत्राटदार आला की दोन, पाच लाख रुपये भरायचा आणि किमान पात्रता दोनशे कोटींची करायचा. आम्ही त्यांना सांगायचो तुमच्या बँक खात्यात पन्नास कोटी रुपये असतील तर पुढे या अन्यथा निघून जा. सर्व संचालक मंडळ प्रयत्न करीत असताना देखील आमच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. आजचा मुहुर्त अतिशय चागंले आहे कारण, खासदार गोडसे यांनी दोन मोठ्या व्यक्तींना एकत्र आणून कारखाना सुरु करण्याचे स्वप्न पाहिले, ते अतिशय अभिमानास्पद आहे.

आमदार कोकाटे यांनी आमदार अहिरे यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, त्यांनी माझ्या समोर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांना कारखाना सुरु करण्यासाठी सांगितले. इतक्या वेळी त्यांनी गाऱ्हाणे मांडले.

माझ्या मते, हा कारखाना चालवायचा कसा?. कारखान्याची क्षमता १२५० टन आहे. तो चालवील कोण?. ऊसाची परिस्थिती कशी आहे?. त्यावर बँकेचे दिडशे कोटीचे कर्ज आहे. ते भरायचे कसे?. कारखाना सुरु करणे ही मागणी बरोबर आहे. माझीही तीच मागणी आहे, कारण माझा मतदारसंघ देखील त्यात येतो. कारण चार तालुक्यांचे क्षेत्र आहे. त्यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे.

कारखाना सुरु करण्याचे स्वप्न साकार कसे होईल यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी परिश्रम घेतले. त्याला यश आले. मात्र कारखाना सुरु कसा होईल हा प्रश्न होता. तो आजही कायम आहे. असे समजु नका की तो प्रश्न संपला. कारण तुम्हाला ऊस लागणार आहे. ऊसतोडीची मागणी होईल. व्यासपीठावर बसलेल्या आणि उपस्थितांतील पन्नास टक्के लोकांकडे ऊसाटे टिपरूही नाही. कोणा जवळच ऊस नाही. पुढच्या पंचवीस वर्षात सगळ्यांच्या गोवऱ्या म्हसणात जाणार आहे. माझ्यासह कोण कोण जीवंत राहील हे सांगता येणार नाही. मात्र जेव्हढे आयुष्य लाभेल त्यात आम्ही मदतीसाठी तत्पर राहू. फक्त शहाजीराजे आणि दीपक चंदे यांची प्रकृती बरी आहे. त्यामुळे तेच पुढे कारखाना चालवतील. खासदार गोडसे यांनी चांगली साथ दिली तर अडचणच नाही.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com