Nashik: नाशिक तरूणी हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट! लिव्ह-इन रिलेशन अन् तिसऱ्याची एन्ट्री...

Vaishnavi Aware Murder Case, Nashik Murder, Indiranagar Crime: नाशिकच्या इंदिरानगरमध्ये वैष्णवी आवारे हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. आरोपी साहिल लाव्हारेने चाकूने हल्ला करून तिचा खून केल्यानंतर जवळच गळफास घेऊन आत्महत्या केली.
Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Job
Nashik Murder Casesarkarnama
Published on
Updated on

Vaishnavi Aware Murder Case: नाशिकमधील इंदिरानगर भागात घडलेल्या वैष्णवी आवारे या युवतीच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. भर रस्त्यात चाकूने वार करून करण्यात आलेल्या या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला आहे.

हत्या झालेली २० वर्षीय वैष्णवी अनिल आवारे ही मूळची उमरखेड (जि. यवतमाळ) येथील रहिवासी होती. तिचे आई-वडील हयात नसून गावी तिचे आजी-आजोबा राहतात. वैष्णवी ही साहिल लाव्हारे (वय २३) याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या दोघांनी मिळून एक हॉटेल सुरू केले होते, परंतु त्यात त्यांना मोठा तोटा झाला.

Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Job
Lohagad Murder Case: महाबळेश्वरला वाढदिवस, पण त्या आधीच होणाऱ्या नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीनं संपवलं! दोघांना अटक

हॉटेल व्यवसायातील तोट्यानंतर वैष्णवी नाशिकला राहण्यासाठी आली. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या ज्योती राहुल बैरागी हिच्या माध्यमातून तिची दिपाली सोनवणे या नाशिकच्या मैत्रिणीशी ओळख झाली होती. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ती नाशिकमध्ये राहत होती. याच दरम्यान वैष्णवीचा विवाह गोपाळ चौधरी नावाच्या तरुणाशी ठरला होता.

वैष्णवीचा विवाह ठरल्याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या साहिलने गोपाळशी संपर्क साधला आणि वैष्णवीला माझ्यासोबत पाठवून दे, असा आग्रह धरला. हत्येच्या रात्री साहिल नाशिकमध्ये दाखल झाला. रात्री १० च्या सुमारास त्याचा आणि गोपाळचा फोनवर सुमारे २२ मिनिटे संवाद झाला. हा संवाद वैष्णवीनेदेखील ऐकला होता आणि तिने गोपाळला साहिल नाशिकमध्ये आल्याची तातडीने माहिती दिली होती.

Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Job
Beed Murder Case : विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! '...तर खासदार पुत्रालाही अटक करू'; एसपींच्या वक्तव्याने बजरंग सोनवणेंचं टेन्शन वाढवलं

या फोन संवादानंतर इंदिरानगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर रात्री साडेदहाच्या सुमारास साहिलने वैष्णवीवर चाकूने हल्ला करत तिचा खून केला. वैष्णवीची हत्या केल्यानंतर साहिलनेही जवळच्याच जॉगिंग ट्रॅकवर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विवाह ठरल्यामुळे एकतर्फी प्रेमातून साहिलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com