Beed Murder Case : विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! '...तर खासदार पुत्रालाही अटक करू'; एसपींच्या वक्तव्याने बजरंग सोनवणेंचं टेन्शन वाढवलं

SP navneet kanwat Clarifies Position On Saurabh Sonawane In Vilas Ghule Murder Case : बीड-केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले याच्या हत्येला तीन दिवस उलटूनही तणाव कायम आहे. या पार्श्वभूमिवर आज पोलीस अधीक्षक नवनीत कावँत हे केजमध्ये दाखल झाले.
Vilas Ghule Murder Case
Vilas Ghule Murder Casesarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : हॉटेलमध्ये सुरू झालेले भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या विलास घुले या तरूण हॉटेल चालकाचा एका टोळक्याने चाकूने भोसकून खून केला. ही घटना केज तालुक्यातील टाकळी येथे तीन दिवसापूर्वी घडली. या प्रकरणावरून राजकारण तापले असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपूत्र सौरभ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा, अशी मागणी घुले याच्या कुटुंबिय आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. या हत्या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत 9 पैकी 6 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक नवनीत कावँत हे केजमध्ये दाखल झाले आहेत.

तत्पुर्वी रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांशी कावँत यांनी मोबाईलवरून संपर्क साधला होता. आंदोलकांनी खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ यांच्या गाडीतून आरोपी पळाल्याचा आरोप करत त्याच्या अटकेची मागणी केली. यावर आम्ही सौरभ सोनवणे याचा सीडीआर, मोबाईल लोकशन, त्यातील संभाषण आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. मात्र या प्रकरणाशी त्याचा कुठलाही संबंध आढळून आला नसल्याचे सांगीतले. कुठलाही पुरावा हातात असल्याशिवाय त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. उद्या कोर्टात या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध कराव्या लागतात.

तरीही डंप डाटा तपासू, एकही पुरावा हाती लागला तर खासदार पुत्रालाही अटक करू, असा शब्द एसपी कावँत यांनी आंदोलकांना दिला. फरार तीन आरोपींना शोधण्यासाठी आमची टीम राज्यभरात शोध घेत आहे. लवकरच आरोपी अटकेत असतील, असेही काँवत यांनी सांगीतले. तसेच या हत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून केली जाईल, असेही कावँत यांनी जाहीर केले.

Vilas Ghule Murder Case
Ketan Agrawal Murder Case: प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काढला काटा! तिसऱ्या प्रयत्नात कट यशस्वी; जाणून घ्या मर्डर मिस्ट्री

दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनीही आंदोलकांशी मोबाईलवरून संपर्क साधत आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. विधीमंडळात आपण हा विषय लावून धरला आहे, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयावर उत्तर देतील, असे त्यांनी सांगीतले.

बीड-केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले याच्या हत्येला तीन दिवस उलटूनही तणाव कायम आहे. आरोपींच्या अटकेसाठी व सखोल तपासासाठी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले असून, विलासचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट केज पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आला आहे. ​हे प्रकरण थेट विधीमंडळात पोहचले असून केजमध्ये तणावची परिस्थिती आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनछत्रपती संभाजीनगरचे आयजी विरेंद्र मिश्रा बीडमध्ये दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना सूचना दिल्यानंतर, अखेर मंगळवारी सायंकाळी काँवत यांनी केज पोलीस ठाणे गाठले. सध्या काँवत हे घुले कुटुंबीयांशी चर्चा करत आहेत.

Vilas Ghule Murder Case
Pavanraje Murder Case : निंबाळकर खून खटला निकालानंतर राणाजगजितसिंह पाटलांची मोठी मागणी; षडयंत्राची बरीच माहिती माझ्याकडे...

दरम्यान, बीडमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयजी विरेंद्र मिश्रा हे देखील केजच्या दिशेने रवाना झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या धावपळीनंतर आज विलास घुले यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील केज पोलीस ठाण्यात गेले होते. आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com