Nashik kidnapping News : नाशिकमध्ये खळबळ! भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण

Nashik hotel businessman kidnapped : एक कोटींची खंडणी मागितली ; जाणून घ्या, मग पुढे नेमकं काय घडलं?
kidnapped for ransom
kidnapped for ransomSarkarnama
Published on
Updated on

Kidnapping at gunpoint Nashik : नाशिक शहरात एका मोठ्या गुन्हेगारी घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली. शहरातून भरदिवसा एका हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे अगदी फिल्मी स्टाईल हे अपहणऱ केलं गेलं. या घटनेमुळे नाशिकमधील कायदा अन् सुव्यवस्थेबाबबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

कारण, भरदिवसा दुपारी ३ वाजता अपहरणकर्त्यांनी हॉटेल व्यावसायिक निखील दर्याणी यांच्या कारचा पाठलाग केला. त्यांची गाडी सिग्नलवर थांबल्यावर, अपहरणकर्त्यांनी बोलण्याचा बहाणा केला आणि मग पिस्तूलाचा धाक दाखवत त्यांच्याच गाडीत घुसून त्यांचे अपहरण केले.

kidnapped for ransom
K Annamalai Resignation News : तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंचा राजीनामा अन् म्हणाले...

पुढे गाडीत बसल्याबसल्याच अपहरणकर्त्यांनी हॉटेल व्यावसायिक निखील दर्याणी यांना त्यांच्या कुटुंबीयांना फोन करण्यास सांगितले आणि तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यावर निखील दर्याणी यांच्या बंधूने तातडीने पंधरा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवत भावाला सोडण्याची विनंती केली.

यानंतर मग अपहरणकर्त्यांनी त्यांना उपनगर सिग्नलवर बोलावून घेतले आणि १५ लाख रुपये ताब्यात घेत, पुन्हा हॉटेल व्यावसायिकाला घेऊन गरवारे पॉईंटकडे धूम ठोकली. दरम्यान, निखील दर्याणी यांनी मोठ्या शिताफीने अपहरणकर्त्याच्या ताब्यातून स्वत:ची सुटका करून घेतली, यावर मग अपहरणकर्तेही कार सोडून पळून गेले.

kidnapped for ransom
CM Yogi Action Mode : 'वक्फ' बोर्ड दुरूस्ती विधेयक संसदेत पारीत होताच मुख्यमंत्री योगी 'अ‍ॅक्शन मोडवर'!

या सर्व घटनेची आणि घडलेल्या प्रकाराची माहिती निखील दर्याणी यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेण्यास रवाना झाले असून, याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला गेला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com