डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ

छगन भुजबळ यांनी नाशिक शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त दौरा केला
Chhagan Bhujbal & Sameer Bhujbal
Chhagan Bhujbal & Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) जगातील अतिशय महत्वाचे अर्थतज्ञ (Finance Expert) होते. त्यांनी निर्माण केलेल्या घटनेमुळे आपला संपूर्ण देश एकसंघ राहिला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

Chhagan Bhujbal & Sameer Bhujbal
आठ वर्षे धूळखात पडलेली फाईल भुजबळांनी लावली मार्गी!

ते म्हणाले, गेली दोन अडीच वर्षे कोरोनामुळे कुठलेही कार्यक्रम साजरे होत नव्हते. मात्र आता कोरोनाचे (Covid) निर्बंध हटल्याने आज जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची जयंती उत्साहात आपण साजरी करत आहोत याचा आनंद आहे.

Chhagan Bhujbal & Sameer Bhujbal
गिरीश महाजनांची ऑफर नाकारल्याने राजकीय सुडापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवले!

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत उपस्थित बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार वसंत गीते, शिवसेना उपनेते सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर, गजानन शेलार, आनंद सोनवणे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, संजय साबळे, शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, उपस्थित होते.

मंत्री भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातील मोठा राजवाडा, चौक मंडई, दंडे हनुमान मित्र मंडळ, सातपुर आणि स्वारबाबानगर येथे आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. उपस्थित बांधवांना शुभेच्छा दिल्या.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com