NCP Ajit Pawar News : गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) स्थानिक नेता किरण चौधरी याने समाज माध्यमांवर टाकलेल्या पोस्टने संतापाची लाट उसळली आहे. या पोस्टमुळे तणाव निर्माण झाला असून सध्या चौधरी पोलीस कोठडीत आहे.
सोशल मीडियावर अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते किरण चौधरी (Kiran Choudhary) यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीची तुलना औरंगजेबाच्या कबरीशी केली होती. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. याबाबत पोलिसांनी (Police) त्याला अटक केली आहे.
यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) (शरद पवार गट) प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. चौधरी याने सबंध वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेचा अवमान केला आहे. चौधरी याच्या विरोधात पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय कारवाई केली आहे, काय गौडबंगाल आहे. त्या व्यक्तीला पक्षात ठेवणे याचा अर्थ त्याच्या कृत्याला उघड उघड पाठिंबा देणे आहे. असे घडताना दिसते आहे.
याचा अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्या वक्तव्याला आणि विचारसरणीला पाठिंबा आहे, काय असा प्रश्न निर्माण होतो. तसा पाठिंबा नसेल, तर चौधरी याला पक्षात न ठेवता त्याची तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी कडलग यांनी केली आहे.
कोल्हापूरसह राज्याच्या काही भागात यापूर्वीही समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकून काही समाजकंटकांनी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील पोलिस याबाबत अधिक सजग आहेत. त्र्यंबकेश्वर येथे किरण चौधरी याने केलेल्या प्रकाराचा हेतू असाच काही तर नाही ना याचा सध्या पोलीस तपास घेत आहेत. या प्रकारावरून शहरातील वातावरण बिघडू नये यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास मोरे यांनी देखील कारवाईच्या मागणीसाठी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.