मालेगावचा पुढचा आमदार पाटील अन् भुजबळांनी ठरविला; आता २०२४ ची प्रतिक्षा"

Malegaon Congress Corporators join NCP : जयंत पाटील यांनी तर विधानसभा उमेदवारीचीच घोषणा केली
malegaon
malegaon Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मालेगावामध्ये राष्ट्रावदीने काँग्रेसला मोठा धक्का देत खिंडार पाडलं आहे. मालेगावामधील काँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद शेख शफी, आसिफ शेख आणि मालेगावच्या महापौर ताहेरा शेख रशीद यांच्यासह काँग्रेसच्या (Congress) एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (Malegaon Congress Corporators join NCP) कोरोना नियमांमुळे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कार्यालयात छोटेखानी समारंभात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मालेगावमधील पुढचा आमदार ठरला असल्याचे सांगत आता राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ २०२४ च्या निवडणुकांची प्रतिक्षा असल्याचे सांगितले. जयंत पाटील यांनी तर यावेळी बोलताना एक प्रकारे आसिफ शेख यांच्या २०२४ च्या विधानसभा उमेदवारीचीच घोषणा केली. ते म्हणाले, आसिफ भाईंनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करुन काही महिने उलटले, पण त्यांनी ज्या जोरात काम करायला सुरुवात केली आहे, असा माहोल याआधी मालेगावमध्ये बघितलेला नाही. यापूर्वी देखील आमचा पक्ष तिथे होता, पण आसिफ भाईंचे पक्षाप्रतिचे प्रेम आणि त्यांचे काम या गोष्टींमुळे मी हा पहिल्यांदाच अनुभवत आहे. त्यामुळे मला वाटतं की मालेगावमधील पुढचा आमदार आजचं ठरला आहे. आता केवळ २०२४ च्या विधानसभेची प्रतिक्षा आहे.

malegaon
काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले अन् अजितदादा पहिल्याच दिवशी हेडमास्तर झाले

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, आसिफ भाईंनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडली. त्यानंतर मालेगाव आणि नाशिकमध्ये बातम्या येत राहिल्या की ते आता एमआयएममध्ये जाणार, या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार. आमची महाविकास आघाडी असल्यामुळे तीन पक्षांनी एकमेकांना दुखवायचे नाही असे ठरवले आहे. त्यामुळे आम्ही बरेच दिवस शांत होतो. पण मीच शेवटी त्यांना म्हणालो, इकडे तिकडे जाण्यापेक्षा आता राष्ट्रवादीत या. तुमच्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, असा खुलासाही मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

malegaon
धक्कादायक; सेना आमदाराला ED शी सेटलमेंट करण्याची ऑफर

मंत्री भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, नगरसेवकांच्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले. नगरसेवकांनी काँग्रेस का सोडली हे मी सांगू शकत नाही, पण त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र आता प्रवेश केल्यानंतर आपण चुकीच्या पक्षात आलो असे तुम्हाला कधीही वाटणार नाही, असा विश्वास यावेळी भुजबळ यांनी दिला. तसेच मालेगावमध्ये आता राष्ट्रवादीचा महापौर झाला आहे, मात्र आगामी निवडणुकीतही इथे राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर व्हायला हवा. यासोबतच २०२४ किंवा कधीही होईल तेव्हा मालेगावमधील पुढील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार आहे, असा आशावाद भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com