राष्ट्रवादी म्हणते, भाजप आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा!

फलकांबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Ambadas Khaire
Ambadas KhaireSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनानिमित्त (Flyover inaugration) केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या स्वागतासाठी शहरात लावण्यात आलेल्या फलकांबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP youth wing) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेने फलकांबद्दल भाजपला (BJP) न्याय (Justics) दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, अनधिकृत फलक लावल्याबद्दल आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

Ambadas Khaire
नाशिक महापालिकेची निवडणूक छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना शहराचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून पक्षातर्फे फलक लावण्यात आले नाहीत. राष्ट्रवादी भवन कार्यालयाच्या आवारात स्वागत फलक लावले होते. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हे फलक हटविले.

कार्यकर्त्यांनी शांततेची भूमिका घेत फलक काढले, असे सांगून श्री. खैरे म्हणाले, की महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या स्वागताचे फलक त्यांच्या आमदारांनी शहरात लावले. त्याविरुद्ध महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. तसेच लावलेले फलक हटविले नाही. त्यावरुन सत्तेत असलेल्या पक्षाला महापालिकेने झुकते माप दिले का, हा खरा प्रश्‍न आहे. शिवाय आणखी एका आमदारांनी लावलेल्या फलकासंबंधी परवानगी घेत फलकावर परवानगी क्रमांक टाकले आहेत.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com