`राष्ट्रवादी`च्या उमेदवाराच्या कुटुंबियांचा ध्वजारोहणप्रसंगी आत्मदहनाचा प्रयत्न!

मयत महिलेच्या गुन्ह्यातील संशयीत भाजप नेत्यांना अटकेची मागणी
NCP defeated candidate family try to self immolation at sakri
NCP defeated candidate family try to self immolation at sakriSarkarnama
Published on
Updated on

साक्री : येथील (Dhule) नगरपंचायत निवडणूक निकालाचे पडसाद आज ध्वजारोहण कार्यक्रमात उमटले. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पराभूत उमेदवाराच्या कुटुंबातील महिलेचा भाजप (BJP) नेत्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या संशयीत भाजप नेत्यांच्या अटकेच्या मागणीसाठी पराभूत जगताप यांच्या कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

NCP defeated candidate family try to self immolation at sakri
साक्रीतील भाजपचे विजयी नगरसेवक बेपत्ता का झालेत?

ही घटना घटतानाच शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. त्यामुळे पोलिसांची त्यात खुपच तारांबळ उडाली. मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणातील पीडित जगताप व जाधव कुटुंबीयांनी आज सकाळी ध्वजारोहणापूर्वी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी मात्र प्रसंगावधान राखत या सर्वांना बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला.

NCP defeated candidate family try to self immolation at sakri
`एमआयएम`च्या तंत्रापुढे हतबल काँग्रेस मालेगावमध्ये खल्लास!

येथील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हाणामारी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराच्या कुटुंबातील मोहिनी जाधव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने गेल्या आठवडाभरापासून वातावरण तापलेले आहे. अशाच यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाकल करण्यात आला. त्यात भाजपचे विजयी उमेदवार व नेत्यांना संशयीत म्हणून नोंदविण्यात आले आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक व्हावी व कुटुंबाला शासकीय, आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी जगताप व जाधव कुटुंबीयांनी दोन दिवसापूर्वीच प्रशासनाला निवेदन देत प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात आली होती.

असे असताना देखील आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शासकीय ध्वजारोहणाच्या काही वेळ आधीच गोटू जगताप यांच्यासह कुटुंबीयांनी अचानक तहसील कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांना बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान यावेळी जगताप कुटुंबीयांनी रस्ता रोको करत पालकमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी केली होती. प्रशासनाने मात्र या सर्वांची समजूत घालत लवकरच संशयितांना ताब्यात घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावर पुन्हा तीन दिवसांची मुदत पीडित कुटुंबाकडून प्रशासनास देण्यात आली असून, तीन दिवसात अटक आणि मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी पीडित कुटुंबियांशी चर्चा केली तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.एल.गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com