Eknath Khadse Meets Pankaja Munde : खडसेंच्या भेटीनंतर पंकजा काय निर्णय घेणार ; खडसे म्हणाले ; 'संघर्षयात्री..'

Eknath Khadse on Pankaja Munde : ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Eknath Khadse , Pankaja Munde
Eknath Khadse , Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse on Pankaja Munde : भाजपच्या नेत्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे Pankaja Munde)यांनी नुकतंच "मी भाजपची नाही तर भाजप पक्षात मी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे," असं विधान केलं होतं.

मुंडेंच्या या विधानानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. “भाजपमध्ये अस्वस्थथा आहे”, असे खडसे म्हणाले.

या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. या भेटीआधी खडेसेंनी पंकजा मुंडे यांच्या विधानावर भाष्य केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Eknath Khadse , Pankaja Munde
Pawar vs Vikhe News : विखे-पवार राजकीय संघर्ष संपला ? ; दोन्ही नेते एकत्र, राम शिंदे अडचणीत ? ; चर्चांना उधाण..

खडसे म्हणाले, "गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभा आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्थता असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष वर्षांवर्ष ज्यांनी वाढवला. बहुजनांपर्यंत पोहोचला. अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होतोय, पंकजा मुंडे यांचं विधान दुःखद आणि वेदनादायी आहे,"

Eknath Khadse , Pankaja Munde
Brij Bhushan Singh Case FIR Update : ब्रिजभूषण सिंहांवरील FIR मध्ये गंभीर बाबी उघड ; श्वास तपासण्याच्या नावाखाली टी-शर्ट..

भाजपचे दिवंगत नेते, माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांची आज (शनिवारी) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने खडसे हे आज गोपीनाथ गडावर जाणार आहेत. खडसेंनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक फेसबूक पोस्ट केली आहे. या भेटीदरम्यान खडसे-मुंडे भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही

Eknath Khadse , Pankaja Munde
Ahmednagar News : नगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या'घोषणेची आठवण

गेल्या दोन-तीन वर्षांपासूनचे याच गोपीनाथ गडावरुन एकनाथ खडसेंनी आपल्या भाषणातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेच काही दिवसांनी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता

बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com