NCP Satana News: भाजप खासदार, आमदारांच्या कुरघोडीमुळे मिळेना तहसीलदार!

Satana Tahsildar News: सटाणा येथे तहसीलदारांचे पद रिक्त आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणार.
Deepika Chavan
Deepika ChavanSarkarnama

NCP Satana News : बागलाण तालुक्यात दोन महिन्यांपासून तहसीलदार नाही. त्यामुळे आदिवासी बहूल तालुक्यातील शासकीय कामे ठप्प झाली आहेत. खासदार आणि आमदारांच्या वर्चस्वाच्या लढाईत बागलाणला आजपर्यंत कायमस्वरूपी तहसीलदार मिळू शकला नाही. त्यामुळे बागलाणवासीय यांना 'कुणी तहसीलदार देता का, तहसीलदार. अशी म्हण्णयाची वेळ आली आहे. (NCP criticized State Government local BJP MLA)

तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी राज्याचे मुख्यमंत्री, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्र्यासह (Devendra Fadanvis) विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी दिली.

Deepika Chavan
Sanjay Raut News : `कुरुलकर` वरून लक्ष हटविण्यासाठी दंगलींचे कारस्थान!

श्रीमती. चव्हाण म्हणाल्या, की बागलाण हा आदिवासी बहूल तालुका असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र विस्तृत आहे. १७१ ग्रामपंचायतींचा कारभार असल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांची अनेकविध कामे तहसीलदार नसल्यामुळे प्रलंबित आहेत. प्रशासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची कोंडी झाली आहे.

मोठ्या तालुक्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार व खासदार लाभले असून केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता असताना शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जनतेची प्रशासकीय कामेच होत नसल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये शासन विरोधात तीव्र नाराजी आहे. आमदार व खासदारांमध्ये असलेले मतभेद व श्रेय वादाच्या लढाईत बागलाणची जनता भरडली जात आहे.

Deepika Chavan
Amol Kolhe On Bailgada Sharyat: पुन्हा भिर्रर सुरु..; न्यायालयाच्या निकालावर खासदार कोल्हे म्हणाले..

बागलाण तालुक्यास देवमामलेदारांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे तालुक्यात तातडीने कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा आणि सर्वसामान्यांची हेळसांड थांबावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही दीपिका चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com