Amruta Pawar News: `राष्ट्रवादी`ला धक्का...मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवार यांचा भाजप प्रवेश?

NCP: शरद पवार यांच्याशी एकनीष्ठ पवार स्थानिक नेतृत्वाच्या त्रासाला कंटाळून `भाजप`मध्ये
Amruta Pawar
Amruta PawarSarkarnama

Nashik News: जिल्हा परिषदेच्या (ZP) देवगाव गटात दहा हजाराहून अधिक मताधिक्याचा विक्रम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अमृता पवार (Amruta Pawar) आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्थानिक (Nashik) नेतृत्वाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. पवार यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. (Big political shock for NCP, Amruta Pawar will join BJP)

Amruta Pawar
Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी प्रदिर्घ काळ एकनीष्ठ असलेल्या पवार कुटूबातील अमृता पवार यांचा भाजप प्रवेश अनेकांना धक्कादायक ठरला आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्याला कंटाळून हा निर्णय झाल्याची चर्चा आहे.

Amruta Pawar
Kisan Sabha Long March: मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत तोडगा नाही, लाँग मार्च मुंबईकडे...

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य पवार यांनी समर्थकांच्या आग्रहातून हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. आर्कीटेक्ट अमृता पवार या देवगाव (निफाड) जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या होत्या. त्यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक दहा हजारांचे मताधिक्य मिळवल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय प्रवेशाने आगामी निवडणुकीत निफाड विधानसभा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात नवे समिकरण तयार होण्याची शक्यता आहे. देवगाव जिल्हा परिषद गट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात समाविष्ट आहे. स्थानिक स्तरावरील विविध राजकीय कार्यक्रम तसेच गटातील विकासकामाच्या श्रेयवादातून येथे मतभेद निर्माण झाले होते. स्थानिक नेत्यांकडून सातत्याने उपेक्षा केली जात होती. त्याला कंटाळूनच हा प्रवेश झाल्याचे कळते.

Amruta Pawar
Old Pension Scheme: संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा? कुणी काढले आदेश?

आर्की. पवार या गोदावरी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार (कै) वसंतराव पवार आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस निलीमाताई पवार यांच्या त्या कन्या आहेत. तळागाळात संपर्क असलेल्या कल्पक कार्यकर्त्या म्हणून त्या परिचीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com