NCP Dhule News : `राष्ट्रवादी`मध्येच प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल

NCP gives a respect for genuine and loyal followers-महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण सत्तेमागे धावणाऱ्या नेत्यांचे असल्याने कार्यकर्त्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देतात.
Jitendra Marathe in NCP meeting
Jitendra Marathe in NCP meetingSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मूळ पक्ष आपल्याकडेच असल्याबाबत कोणीही शंका बाळगू नये. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्यांवर मोठी जबाबदारी दिली जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केले. (NCP meeting for new appointments of Dhule District)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) धुळे (Dhule) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शिरपूर येथे झाली. या वेळी आगामी निवडणुकांच्या (Elections) तयारीचा आढावा घेण्यात आला.

Jitendra Marathe in NCP meeting
Manikrao Kokate On NDCC Bank issue : जिल्हा बँक ऊर्जितावस्थेत येणे हीच आजची गरज!

या वेळी मराठे म्हणाले, प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच मिळू शकतो. कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न बाळगता पक्षाच्या कामात जोकून द्यावे. आगामी निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यात निष्ठा व विचारांशी बांधिलकी असणाऱ्या नेते, पक्षालाच सामान्य मतदार पाठिंबा देतील.

शरद पवार म्हणजे गट नाही तर एक विचार आहे. त्यांच्या विचारामुळेच पक्षाच्या कठीण काळात पदाधिकारी, कार्यकर्ते एकनिष्ठ राहिले आहेत. जनतादेखील त्यांच्याच पाठीशी राहील, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला.

या वेळी डॉ. महाजन म्हणाले, की आपला पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करतानाही शहर व तालुक्यात पक्षाच्या ३० शाखा स्थापन केल्या आहेत. मेळावे, आंदोलने यांच्या माध्यमातून पक्षाने जनतेत स्थान मिळविले आहे. युवकांचे मोठे संघटन उभे केले असून, पक्षाने बळ दिल्यास आगामी निवडणुकांमध्येही मोठी कामगिरी करून दाखविणे शक्य होईल.

Jitendra Marathe in NCP meeting
Girna Water issue & Politics : अजित पवार गिरणा खोऱ्याला पुन्हा उपाशी ठेवणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन, ज्येष्ठ नेते रमेश करंकाळ, प्रवक्ता हेमराज राजपूत, अमृता महाजन, मनीषा पाटील, रूपचंद पाटील, मोहन पावरा, सत्तार पावरा, सचिन निकम, गौरव पाटील, मयूर लोणारी, वनसिंह पावरा, अनसिंह पावरा उपस्थित होते.

Jitendra Marathe in NCP meeting
#Short : धनंजय मुंडे बघा नेमकं काय म्हणाले ? | Dhananjay Munde | Sharad Pawar | NCP Splits

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com