धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) व माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी रविवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना गुगली टाकली. वानखेडे यांना शिरपूर तालुक्यातील 1500 एकरावरील गांजाची माहिती दिली होती. पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही, असा दावा गोटे यांनी केला आहे. भाजपचे आमदार काशिराम पावरा यांच्या गावात 500 एकरावर गांजा होता, असा आरोपही गोटे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
गोटे यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गोटे म्हणाले, शिरपूर तालुक्यात 1500 एकर जमिनीवर गांजा लावला होता. याची तक्रार मी स्वत: समीर वानखेडे यांच्याकडे केली होती. त्याचे व्हिडीओ शुटिंग ड्रोनद्वारे केले होते. छायाचित्र त्यांच्याकडे पाठवली. नावासकट सगळी माहिती पाठवली होती. पण त्यात काहीही केले नाही. भारती सिंग यांच्याकडे 86 ग्रॅम गांजा सापडला म्हणून त्यांना अटक केली. जिथे हजारो टन गांजा आहे, तिथे कुणीच लक्ष दिलं नाही. कारण तिथं काही मिळालं नसतं. सेलिब्रिटी असतील तर काही पैसे मिळतात, असा आरोपही गोटे यांनी केला.
कालांतराने कळाले, की इथे काही लोक इथे येऊन गेले. पण काही जप्त केले नाही. त्यानंतर धुळे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी एका ठिकाणी कारवाई करून एक ट्रक गांजा जप्त केला. भाजपचे आमदार काशिराम पावरा यांच्या गावात वन विभागाची 500 एकर झाडे तोडून गांजा लावला होता, असा दावा गोटे यांनी केला आहे.
जिथे भाजपचे आमदार तिथेच कसा गांजा लागतो, असा सवाल गोटे यांनी उपस्थित केला. काशिराम पावरा यांच्या सख्या वहिणी तिथे सरपंच आहेत. शेतात काय लावले, हे तलाठी, ग्रामविकास पोलिस पाटील यांना कळते. शहादा आणि शिरपूरमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. सुनिल पाटील याचा संबंध ते जोडत असतील तर आम्ही भाजपचे आमदार गांजा लावतात, असे आम्ही म्हणायचे का, असा सवालही गोटे यांनी उपस्थित केला.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सुनिल पाटील या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. राष्ट्रवादीशी संबंधित असलेला सुनिल पाटील हाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड होता, असा आरोप कंबोज यांनी केला आहे. त्यांचा हा दावा गोटे यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, सुनिल पाटील हा दलाल होता, हे प्रसिध्द झालेल्या बातम्यांवरून दिसते. दलालांचे सगळीकडेच संबंध असतात. आमच्यापैकी काही नेत्यांशी त्याची ओळख असेल. पण राष्ट्रवादीत तो कधीच नव्हता. तो सदस्य किंवा पदाधिकारीही नाही. आता भाजपच्या सगळं अंगलट आलं आहे. त्यामुळे भाजपचे लोक राष्ट्रवादीला गुंतवत आहेत. पण ते कधीच होणार नाही.
सुनिल पाटील याने धुळ्यात 2012-13 मध्ये दहीहंडीचा कार्यक्रम घेतला होता. 11 लाख रुपये बक्षिस होते. तत्कालीन भाजप नेत्यांवर या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी होती. त्यांनीच बॅनर लावले, त्यावर त्यांचेच पोस्टर लावले. त्यावेळचे अध्यक्ष जबाबदारी सांभाळत होते. जो अकरा लाखांची दहीहंडी लावतो, त्याने भाजपच्या नेत्यांना किती पैसे दिले असतील, असा आरोप गोटे यांनी केले. त्यामुळे भाजपचा या प्रकरणाशी निश्चितपणे भाजपचा संबंध आहे, असा दावाही गोटे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.