Bhujabal Vs Jarange: जरांगे मुख्यमंत्री होणार, आपलं वागणं सुधारा; भुजबळ असं का म्हणाले?

NCP Leader Chhagan Bhujabal on Manoj Jarange Rally:सभेसाठी पाच लाखांची गर्दी होणार, असा दावा जरांगे यांनी केला होता, पण पोलिसांच्या अहवालानुसार सभेला फक्त आठ हजारच लोक जमा झाले होते, असे सांगत भुजबळांनी जरांगे यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.
Bhujbal Vs Jarange
Bhujbal Vs JarangeSarkarnama
Published on
Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे याचा निर्णय २९ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु आहे. काही इच्छुकांनी आपल्या उमेदवारीवरुन जरांगे यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.

मनोज जरांगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नातं जगजाहीर आहे. येवला मतदारसंघात भुजबळांच्या विरोधात जरांगेंचा (Manoj Jarange) उमेदवार असेल का? अशी चर्चा रंगली असतानाचं भुजबळांनी जरांगेंच्या विधानसभा लढविण्याच्या विचाराची खिल्ली उडवली आहे.

मनोज जरांगे यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप झाला. यावेळी होणाऱ्या सभेसाठी पाच लाखांची गर्दी होणार, असा दावा जरांगे यांनी केला होता, पण पोलिसांच्या अहवालानुसार सभेला फक्त आठ हजारच लोक जमा झाले होते, असे सांगत भुजबळांनी जरांगे यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. आंदोलन सुरु झाल्यापासून जरांगे मला शिव्या देत आहेत. मला शिव्या देण्याचे काय कारण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या आंदोलनात शिकलेली माणसे आहे, अशी माणसे शिव्या देतात.

Bhujbal Vs Jarange
VIDEO आशा बुचके यांच्या आंदोलनाची रुपालीताईंनी हवाच काढली! अजितदादांना काळे झेंडे दाखवणं राजकीय स्टंट

त्यांना मी सांगितले आहे, आगामी विधानसभा मतदारसंघात 288 मतदारसंघात उमेदवार द्या, त्यांच्यासाठी तयारी करा, मला शिव्या देऊन काय फायदा आहे. तुमचे उमेदवार निवडून येण्यासाठी वेळ द्या. तुमचे उमेदवार निवडणूक येणार, कदाचित तुम्ही मुख्यमंत्रीही होणार, त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिव्याशाप देऊन चालत नाही, त्यामुळे आतापासूनच आपलं वागणं सुधारले पाहिजे, असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला. भुजबळांनी जरांगेंना डिवचल्यानंतर दोन्ही नेत्यामधील वाद चिघळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

वादग्रस्त विधान करणारे महंत रामगिरी महाराज यांच्याबाबत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "प्रबोधन करतांना दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाचे मन दुखवू नये. हिंदू,मुस्लिम सर्वांनी शांतता पाळावी,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com