मलिकांवरील ईडीच्या कारवाईवर भुजबळांची हताश प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED)अटक केली आहे.
 Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गुंड दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते (NCP) व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरावर आज (ता. 23 फेब्रुवारी) ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटकही करण्यात आली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.

भाजपने (BJP) मलिकांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणी ईडीच्या चौकशीचा सामना केलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळांनी हताश होत प्रतिक्रिया दिली आहे. 22 वर्षापुर्वीच्या जमीन प्रकरणी मलिकांना अटक केली जात आहे. अटकच करायची म्हटल्यावर काहीही कारण देता येते, अशी थोडक्यात प्रतिक्रिया देत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 Chhagan Bhujbal
हा तर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपचा नवा धंदा

भुजबळ म्हणाले की, २२ वर्षांपूर्वी मलिक यांनी कुणाकडून तरी जमीन घेतली. हे प्रकरण आता काढले जात आहे. या प्रकरणाची नेमकी आपल्याला कल्पना नाही. मात्र, काढायचेच झाले तर कुठलीही प्रकरणे काढता येतात. शेवटी अटकच करायची झाली तर कोणतेही कारण सांगून अटकेची कारवाई करता येते, असे हताश होत भुजबळांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात आहे. मात्र, हे लोकांच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्रातला हा सगळा प्रकार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना माहिती आहे की नाही याची कल्पना नाही. मात्र, जे काही चाललंय ते बरोबर नसून देशात हे वातावरण काही बरोबर नाही, अशी सौम्यच शब्दात भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे.

 Chhagan Bhujbal
ED चे टार्गेट सेना-राष्ट्रवादीच! काॅंग्रेस नेत्यांचा म्हणूनच सुटकेचा निःश्वास....

दरम्यान, ईडीने मलिकांना अटक केल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आले. मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून जमीन घेतल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आल्यावर राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर, आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात असून भाजपकडून मात्र, फटाके फोडून आनंद साजरा केला जात असून मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. मलिकांच्या अटकेनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय उत्तर दिले जाते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com