Girish Mahajan: नाथाभाऊ आता काय करणार? गिरीशभाऊंनी थेट पुरावेच मागितले!

NCP Leader Eknath Khadse Join BJP News: खडसे म्हणतात, जे पी नड्डा यांनी माझ्या गळ्यात भाजपचा दुपटा टाकला, पण त्यांची ही दुटप्पी भूमिका फार काळ चालणार नाही. त्यांचा भाजप प्रवेश झाला असेल तर त्यांनी तो फोटो दाखवावा," असे आव्हान महाजनांनी दिले आहे.
Eknath Khadse Join BJP News
Eknath Khadse Join BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी आपला भाजप प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते झाला असल्याचे म्हटलं आहे. त्याला भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी थेट आव्हान दिले आहे. भाजप प्रवेशाचं पुरावे महाजन यांनी खडसे यांच्याकडे मागितले आहेत. खडसे हे पुरावे देतील का, हे लवकरच समजेल.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याला खडसे यांनी दुजोरा दिला होता. पण अद्याप त्यांचा जाहीर प्रवेश झालेला नाही, गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपला भाजप प्रवेश रखडला असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

खडसे वारंवार सांगत आहे की फडणवीस आणि माझ्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे, तर दुसरीकडे ते सांगत आहे की जे पी नड्डा यांनी माझ्या गळ्यात भाजपचा दुपटा टाकला, पण खडसेंनी दुटप्पी भूमिका फार काळ चालणार नाही. त्यांचा भाजप प्रवेश झाला असेल तर त्यांनी तो फोटो दाखवावा," असे आव्हान महाजनांनी दिले आहे.

Eknath Khadse Join BJP News
Transfer Administrative Officer: आमदारांच्या 'अर्थकारणा'तून मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या?

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या भाजप प्रवेशावरुन त्यांना डिचवलं आहे. "खडसे कधी म्हणतात मी भाजप पक्षात आहे, तर कधी सांगतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. माझे मत आहे की, खडसे ना भाजप ना राष्ट्रवादी, ते फक्त आपल्या कुटुंबात आहेत. आपल्या कुटुंबासाठीच ते सबंध राजकारण करतात. जनतेच्या प्रश्नांवर त्यांना काहीही देणे-घेणे नाही," असा टोला पाटलांनी खडसेंना नुकताच लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, अद्यापही पक्ष प्रवेश झालेला नाही. खडसे यांनी इशारा देत जर प्रवेशासाठी काही दिवस वाट पाहू नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात पु्न्हा सक्रीय होऊ, असा इशारा दिला. मात्र, त्यांची दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com