Eknath Khadse vs Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. आणीबाणीला ५० वर्ष झाल्याने झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या दोघांनी एकमेकांना टार्गेट केले. यावेळी दोघांनीही एकमेकांना लगेचच प्रत्युत्तर देखील दिले.
शिवसेनेचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भाजप (BJP) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक नेत्यांचा प्रखर विरोध होता. मंत्री गिरीश महाजन यांनी श्री. बडगुजर यांच्या प्रवेशासाठी आपले वजन वापरत स्थानिक नेत्यांना बाजूला केले होते.
सुधाकर बडगुजर यांचा संबंध मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी जोडला जातो. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आता आपल्याला भाजप पक्षात जाण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही. या पक्षात सुधाकर बडगुजर सारख्या लोकांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे तिथे आता गुंडांचे राज्य सुरू होईल, असे खडसे म्हणाले.
आणीबाणीला पन्नास वर्ष झाल्याने झालेल्या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. संदर्भ पकडून श्री खडसे (Eknath Khadse) यांनी मंत्री महाजन जन्माला येण्याआधी पासूनचा इतिहास मला माहिती आहे. महाजन राजकारणात आले त्याच्या आधीपासून मी शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात होतो.
मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे बाल स्वयंसेवक आहेत, असे खडसे यांनी हिणवले. त्याला मंत्री महाजन यांनीही अजिबात वेळ न दवडता लगेचच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले होय मी बाल स्वयंसेवक आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे हे सत्यच आहे, हे मान्य करायला मला काहीच वावगे वाटत नाही.
जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाद सतत धुमसत असतो. त्याची राज्यभरात चर्चा असते. या दोघांच्याही आरोप प्रत्यारोपांना माध्यमांमध्ये देखील स्थान मिळत असते. त्यामुळे या दोघांमध्येही हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.