NCP News: देश विकायला भाजपला बारामतीची जागा हवी आहे का?

पुरषोत्तम कडलग म्हणाले, अन्न-पाण्यावर जीएसटी लवणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर काय केल ते सांगावे.
Purshottam Kadalag
Purshottam KadalagSarkarnama

नाशिक : भारतीय जनता पक्षाने (BJP) बारामती (Baramati) येथे बैठक घेत, ही जागा जिंकणार असे म्हटले आहे. ही भाषा म्हणजे सत्तापिपासू राजकारणाची परीसीमा आहे. सत्तेत आल्यावर भाजपने सामान्यांचे हाल केले. महागाई (Inflation) वाढवली. सरकारी संपत्ती विकण्याचा धडाका लावला आहे. आता बारामतीची जागा काय देश विक्री करण्यासाठी हवी आहे का?. सत्तेच्या या गुर्मीला जनता धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (NCP) प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग (Purshottam Kadalag) यांनी दिला आहे. (NCP leaders criticise BJP policy sale of Government properties to Capitalist)

Purshottam Kadalag
MVP News: नितीन ठाकरे यांनी शरद पवारांची दिशाभूल केली!

ते म्हणाले, सर्वसामान्यांची फक्त पिळवणुक केली. जेष्ठ नागरीकांच्या सवलती बंद केल्या. महागाईत सर्वसामाण्यांची हाल करण्यात कुठलाही कसर केली नाही, बेरोजगारी कमी करण्याच्या घोषणा करून उलट तरूणांना देशोधडीला लावले. देशांतल्या सर्व प्रमुख विभागांचे खाजगीकरण करून विकण्याचे काम केलं. आठ वर्षाच्या सत्तेत फक्त राज्यातील सत्ता `खोक्यांच्या` माध्यमातुन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने याहून वेगळे काही केले आहे काय.

Purshottam Kadalag
Shivsena : नवनीत राणांचा उल्लेख `सिगारेट पिणारी बाई` असा करत खैरेंची टीका..

ते पुढे म्हणाले, देशला महासत्ता करण्याचे स्वप्न दाखवुन जातीयवाद पसरवला. यातील एकाही विषयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत नाहीत. ते फक्त सत्ता हस्तगत करण्याचीच भाषा करतात तेही कोणत्या मतदार संघात?.

शरद पवार जेव्हा जेव्हा भाजप विरोधी प्रादेशिक पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रीय यंत्रणांनी पवार साहेबांना `ईडी`ची नोटीस पाठवून बोलावण्याचा प्रयत्न केला होता. आज देखील शरद पवार प्रादेशिक पक्षांची मोट बांधत असताना आमदार रोहित पवार यांच्यावर `ईडी`ची नोटीस येते. मात्र महाराष्ट्रातील जनता ही अतिशय हुशार असून मागील सात आठ वर्षात भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि स्वच्छ झाले अशा नेत्यांची यादी ती बघते आहे.

`भाजप`मध्ये गेले अन् पवित्र झाले. त्यापैकी पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले परंतु ब्लॅकमेलिंग करून भाजपमध्ये बळजबरी प्रवेश घेतलेले चित्रा वाघ, छत्रपती उदयनराजे भोसले, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, प्रशांत परिचारक, रणजीत सिंग मोहिते पाटील, विजयकुमार गावित, हिना गावित, सम्राट महाडिक, राजवर्धन कदमबांडे, श्रीमती सूर्यकांता पाटील, पद्मसिंह पाटील, राणा जगदीश सिंह पाटील, सुरेश धस, मोनिका राजळे, निरंजन डावखरे, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, नमिता मुंदडा, धनंजय महाडिक, मधुकर पिचड, वैभव पिचड, गणेश नाईक, कालिदास कोळमकर, संजीव नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, संदीप नाईक, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संजय काका पाटील या यादी वरून लक्षात आले असेल की, हे नेते पवार यांना सोडून का गेले याचा शोध आता जनताच घेईल.

या नेत्यांतील अनेक जण सहकार क्षेत्र, साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती, महानगरपालिका, असे प्रतिनिधी होते. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. प्रवेश केल्यानंतर सर्व फाईल बंद करण्यात आल्या, परंतु यावर भारतीय जनता पार्टीचा कोणताही नेता, मीडिया, बोलत नाही. आता ते बारामतीचे स्वप्न पहात आहेत. बारामतीकर जनता भाजपला चांगलाच धडा शिकवेल.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com