NCP News; अजय बोरस्तेंनी हद्दीत रहावे, सिल्व्हर ओक पर्यंत जाऊ नये

राष्ट्रवादी काँग्रेसचे कडलग यांनी बोरस्तेंना इशारा दिला
Purshottam Kadlag & Ajay Boraste
Purshottam Kadlag & Ajay BorasteSarkarnama

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कडक शब्दात इशारा दिला आहे. बोरस्ते यांनी आपल्या हद्द ओळखून रहावे, `सिल्व्हर ओक`चे नाव घेऊ नये. कारण शिंदे गटाने आपले दलाल नाशिकला (Nashik) पाठवून महापालिकेच्या नगरसेवकांचा (NMC) हा प्रवेश कोणते आमिष देऊन घडवला हे जाहीर करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरषोत्तम कडलग (Purshottam Kadalag) यांनी दिला आहे. (Shinde group send there agents in nashik for Ex. corporators transposition)

Purshottam Kadlag & Ajay Boraste
Prakash Ambedkar news; देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

शिवसेनेशी बंडखोरी करून माजी नगरसेवक बोरस्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावर झालेल्या टिकेला उत्तर देताना त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. आम्ही दलाल नाही मात्र, `सिल्व्हर ओक`चे दलाल कोण हे सर्वश्रृत आहे, असे विधान केले होते. त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.

Purshottam Kadlag & Ajay Boraste
Sureshdada jain news; कट्टर विरोधक एकनाथ खडसे भेटीत काय होईल?

ते म्हणाले, नाशिकच्या १२ माजी नगरसेवकांना प्रत्येकी दहा कोटी रूपयांची कामे मिळाल्यामुळे तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला अशी शहरात चर्चा आहे. श्री. बोरस्ते गुवाहाटी फॉर्मुल्याप्रमाणे नाशिक शहरांमध्ये तूम्ही केलेला प्रवेश आणि त्यासाठी तुम्हाला खोक्याच्या स्वरूपामध्ये भेट भेटणार आहे, त्या दलाली बद्दल बोलावे. विकास कामे करा परंतु टक्केवारीचे गणित डोळ्यासमोर ठेवून करू नका.

महानगरपालिकेमध्ये दुकान मांडून किमान दहा ते वीस टक्के वसुली करून महानगरपालिका ठेकेदारांना हाताशी धरून खोक्याच्या स्वरूपात तुमच्या खिशामध्ये रक्कम जाणार आहे. ही गोष्ट सर्वसामान्य नाशिककरांना ज्ञात आहे. अजय बोरस्ते तुमचा राजकीय प्रवास देखील नाशिककरांना माहिती आहे. आधी भाजप, त्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश करणे त्यानंतर उपमहापौर, विधानसभेचा उमेदवार, महानगर प्रमुख महापालिकेचा गटनेता, स्थायी समितीचा सदस्य अशा विविध पदाचे लाभ घेऊन स्वार्थासाठी पक्ष बदलणारी संस्कृती राजकारणामध्ये रुजू करणारे तुम्ही आहात.

सत्तेचे सर्व लाभ घेऊन आणि व्यक्तीगत विकास साधून पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांमध्ये तुमचं नाव पहिल्या दहा मध्ये येईल, ही नोंद नाशिककरांनी घेतले आहे.

ज्या खासदार संजय संजय राऊत आणि नाशिक जिल्ह्याचे निरीक्षक या नात्याने किंवा संपर्कप्रमुख या नात्याने शहराचा विकास करण्यासाठी वेळोवेळी सत्ता दिली, त्यातील महत्त्वाचे पद तुम्हाला दिले. त्या व्यक्तीबद्दल सिल्व्हर ओकचा दलाल असे म्हणणे, ही तुमची बौद्धीक पातळी काय हेच दाखवते आहे.

ज्या प्रकारे कावीळ झालेल्या माणसाला सर्व पिवळे दिसते तसे टक्केवारी खाणाऱ्या व्यक्तीला सर्वच दलाल दिसतात. मात्र वस्तुस्थिती तशी नसते. महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा होता. थोर पुरुषांचा इतिहास असणारा नाशिक शहर तुमच्या अशा कारवायांना कधीही साथ देणार नाही. लक्षात ठेवा होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये संबंध नाशिककर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com