Chhagan Bhujbal News: भुजबळांच्या विधानात चुकीचं काय? राष्ट्रवादीच्या नेत्यानं घेतला राणेंचा समाचार

Nashik News: भुजबळांनी जे विधान केले आहे. त्यात काय चुकीचे आहे? भुजबळ यांनी सर्वांच्या मनातील प्रतिनिधिक भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे राणे यांनी भुजबळ यांच्याबाबत केलेले विधान योग्य वाटत नाही.
Chhagan Bhujbal - Nilesh Rane
Chhagan Bhujbal - Nilesh RaneSarkarnama

NCP Vs BJP News, 29 May: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपच्या "चारसो पार" या घोषणेबाबत विधान केले होते. त्यावरून भाजप नेते नीलेश राणे यांनी टीका केली होती. यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बैठकीत झालेल्या विचार मंथनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी भाषण केले होते. यावेळी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील "चारसो पार" या घोषणेवर वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाचे काही नेते नाराज झाले आहेत.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane)यांनी भुजबळ भाजपवर टीका करतात. याबाबत नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ यांना आवरण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील घोषणेवरून महायुतीच्या दोन पक्षांतील नेत्यांमध्येच जिंकल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता याबाबत अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर (UdayKumar Aher)हे भुजबळ यांच्या बाजूने उभे राहिले आहेत.

Chhagan Bhujbal - Nilesh Rane
Sangli News: सांगली बँक गैरव्यवहार प्रकरणात 'स्वाभिमानी'ची उडी; राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा

आहेर म्हणाले, "ज्येष्ठ नेते भुजबळ यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यात काय चुकीचे आहे? भुजबळ यांनी सर्वांच्या मनातील प्रतिनिधिक भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे भाजप नेते राणे यांनी भुजबळ यांच्या बाबत केलेले विधान योग्य वाटत नाही. याउलट त्यांनी भाजपच्या घोषणेचा अभ्यास केला पाहिजे.

भारतीय जनता पक्षाने केलेल्या चारसो पार या घोषणेमुळे जनतेत वेगळा संदेश गेला. भाजपला देशाची राज्यघटना बदलायची आहे, असा संदेश अल्पसंख्याक , दलित, ओबीसी आणि सामान्य मतदारांमध्ये गेला. तो पुसून काढण्यात यश आले नाही. त्याबाबत मतदारांची समजूत काढता काढता प्रचारात सगळ्यांची दमछाक झाली. त्याचा परिणाम कदाचित निवडणुकीच्या निकालात देखील दिसून येईल. थोड्याफार प्रमाणात का होईना निकालावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती वाटते. त्यामुळे भुजबळ यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा विचार करावा.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com