एरंडोल : नवाब मलीक (Nawab mallik) हे सप्रमाण घोटाळा व खोटेपणा उघड करतात. त्यामुळेच भाजपने (BJP) त्यांची धास्ती घेतली आहे. त्यांच्या टिका व आरोपांना भाजपच्या बोलघेवड्या यंत्रणांकडे काहीही उत्तर नसल्याने मलीक यांची प्रचंड धास्ती घेतली आहे. या धास्तीमुळेच नवाब मलीक यांच्यावर कारवाई झाली. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) नेते भाजप विरोधात सत्य बोलणे थांबवणार नाही, असा इशारा माजी मंत्री सतीश पाटील यांनी दिला.
राज्याचे कामगार व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री व पदाधिकारी यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केंद्र सरकार व भाजपवर आक्रमक शैलीत टीका केली. केंद्रीय यंत्रणांचा वापर केला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि पदाधिकारी घाबरणार नाहीत, असे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि पदाधिकारी केंद्र सरकार व भाजपविरोधी भूमिका मांडत असल्यामुळे त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मंत्री, नेते व पदाधिकाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करून अटकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, शहराध्यक्ष बबलू चौधरी, नगरसेवक अभिजित पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, नगरसेवक अभिजित पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, असलम पिंजारी, किशोर पाटील, धीरज पाटील, ॲड. अहमद सय्यद, दिनेश पवार, भगतसिंग पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नाना महाजन, नरेश भोई, संदीप वाघ, कपिल पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.