जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली असून, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी भाजपच्या (BJP) विरोधात आंदोलने सुरू केली आहेत. आता याच एका आंदोलनात भाजप नेत्यांबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांची जीभ घसरली.
मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावमध्ये महाविकास आघाडीने आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप नेत्यांबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी काही नेत्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे शाब्दिक युद्ध सुरू होण्याची चिन्हे आहेत.
काय म्हणाले आमदार पाटील?
चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही. चंद्रकांत पाटील यांचे हे षडयंत्र आहे. किरीट सोमय्यांना हाताशी धरून सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास आहे, अशी खोचक टीका अनिल पाटील यांनी केली आहे. आमदार अनिल पाटील हे आधी भाजपमध्ये होते. त्यांनी चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. नंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.