Manikrao Kokate: निधीवरुन मंत्र्यांचे नखरे, आता तरी सुधरा; नाहीतर निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं लागेल!

Manikrao Kokate Advice to Ministers Girish Mahajan DCM Ajit Pawar: मंत्री महोदय जबाबदारीने वागत नाहीत, मंत्रालयात येत नाही. लोकांची कामे करीत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाही, त्यांनी त्यांची कामे नीट करावी, अशी सूचना कोकाटे यांनी केली.
MLA Manikrao Kokate
MLA Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

निधी वाटपावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार अन् मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आक्रमक झाले आहेत. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घरचा आहेर दिला आहे.

"सगळ्याच मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यांचे काय सुरू आहे, त्यांनाच कळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आमदारांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना द्याव्या. निधीवरून मंत्र्यांनी नखरे केले, भांडण केले, आणि फाईल अडवली तर मंत्र्यांना निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं लागेल," असा इशारा कोकाटे यांनी दिला.

"मंत्र्यांनो, सुधरा, लोकाभिमुख काम करा, असा सल्ला कोकोटे यांनी दिला. मंत्री महोदय, जबाबदारीने वागत नाही, मंत्रालयात येत नाही. लोकांची कामे करीत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाही, त्यांनी त्यांची कामे नीट करावी," अशी सूचना कोकाटे यांनी केली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं होतं...

अजित पवार यांच्या गटातील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनीच मंत्रिमंडळात मांडला होता. त्याची आठवण करून देत महाजन म्हणाले, "नको तिथे खर्च नको, अशी तुमची भूमिका आहे, तर मग इथे खर्च कशाला?" असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील वातावरण चांगलंच गरम झाले होते.

MLA Manikrao Kokate
Thackeray group: गिरीश महाजनांच्या मतदारसंघात ठाकरे गट ॲक्टिव्ह; आंदोलनांचा धडाका

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांच्याकडे असलेल्या ग्रामविकास खात्याला रस्त्यांच्या योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर अजित पवार संतप्त झाले आणि "पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का?" असा सवाल गिरीश महाजन यांना केला. त्यावर गिरीश महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता अजित पवार यांना उत्तर दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com