Nilesh Lanke on Padalkar :...अन्यथा पडळकरांना नीट करायला वेळ लागणार नाही; निलेश लंकेंचा इशारा

Nilesh Lanke vs Gopichand Padalkar : निलेश लंके यांचे गोपीचंद पडळकरांना तिखट शब्दात प्रतिउत्तर
Nilesh Lanke vs Gopichand Padalkar
Nilesh Lanke vs Gopichand Padalkar Sarkarnama
Published on
Updated on

Ahmedngar News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरमधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आपल्या भाषणात अनेकदा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. पडळकर यांनी केलेल्या एकेरी उल्लेखावर आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल करत प्रतिउत्तर दिलं आहे.

"आपली उंची काय? आपण कुणाबद्दल बोलतात. शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला मिळालेला परिस आहे. आमच्यावर पक्षाने चांगले संस्कार केले आहेत, अन्यथा पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही", असा थेट इशारा निलेश लंके यांनी आमदार पडळकरांना दिला आहे.

Nilesh Lanke vs Gopichand Padalkar
Rohit Pawar News : शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका, तरी गप्प का ? रोहित पवारांचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांना संतप्त सवाल

आमदार पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करत खिल्ली उडवली होती. यानंतर राष्ट्रवादीकडून पडळकर यांच्या वक्तव्याबद्दल टीका करण्यात आली. पण ती काही मोजक्या नेत्यांनीच आणि सौम्य पद्धतीची टीका केली. मात्र, रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांबद्दल काहीशी नाराजी व्यक्त करत पवार साहेबांबद्दल एकेरी पद्धतीने उल्लेख होत असताना पक्षातील अनेक नेत्यांनी अपेक्षित असे प्रतिउत्तर दिले नसल्याचे म्हंटले होते. त्यानंतर आता निलेश लंके यांनी पडळकरांना तिखट शब्दात प्रतिउत्तर दिले आहे.

"आपली उंची काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला मिळालेला परिस आहे. त्यांच्यामुळे राज्याचा विविध क्षेत्रात विकास झालेल्या असून दुष्काळी भागाला त्यांच्याच दूरदृष्टीमुळे शेतजमिनीचे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अशा शरद पवारसाहेबांसारख्या जेष्ठ नेत्यावर कवडीमोल किंमत असलेले लोक टीका करत असून आणि त्यांचा उल्लेख एकेरी करत आहेत. यावरूनच पडळकर यांची आणि सुसंस्कृतपणाची भेट झाली दिसत नाही", असं लंके म्हणाले.

Nilesh Lanke vs Gopichand Padalkar
Sharad Pawar on Joint Election : कर्नाटकचे निकाल पाहता लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र अशक्यच...

"आता उन्हाळी सुट्ट्या सुरू असून विविध शाळांमध्ये संस्कार शिबिरांचे आयोजन केलं जात आहे, अशा एखाद्या संस्कार शिबिरात आमदार पडळकरांना दाखल करण्याची गरज आहे. पडळकर हे नेहमी काही न काही वाचाळ वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांना नीट करायला वेळ लागणार नाही, मात्र, आमचा पक्ष संस्कार असलेला पक्ष आहे".

"आम्ही संयमाने वागत-बोलत असतो. मी (आमदार लंके) आमदार असलो म्हणून देशाच्या पंतप्रधानांवर काहीही टीका करणे उचित नसते, याची समज आम्हांला राष्ट्रवादीने शिकवलेली आहे. त्यामुळे आमच्यावर असलेल्या चांगल्या संस्कारांचा गैरफायदा पडळकरांनी घेऊ नये", असा इशारा आमदार लंके यांनी यावेळी दिला.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com