Rohit Pawar on Modi: आता जरा अतीच होतंय...; गुगलचीही गुंतवणूक गुजरातमध्येच; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

Political News: गुंतवणूक दरवेळी गुजरातमध्येच का? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल
Rohit Pawar on Modi
Rohit Pawar on ModiSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: पंतप्रधान विदेश दौऱ्यात उद्योजकांच्या भेटी घेऊन देशात गुंतवणूक आणण्यासाठी चर्चा करत असतात. हे सर्व माहीत असतानाही आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारशी योग्य तो समन्वय साधून किंवा योग्य ती लॉबिंग करून महाराष्ट्रात एखादी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. मात्र, राज्य सरकार या संदर्भात पूर्णतः अपयशी ठरलंय, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेटीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी भेट झाली. त्यानंतर गुगलचे सीईओ पिचाई भेटी संदर्भात जी बातमी आली, त्यामध्ये पिचाई यांनी गुगल दहा मिलियनची गुंतवणूक भारतात करणार असून ही गुंतवणूक गुजरातमध्ये होण्याची शक्यता असल्याचे बातम्यात म्हटलं गेलं आहे.

Rohit Pawar on Modi
Rohit Pawar slams Ram Shinde : मंत्र्यांना केवळ फोन करून मंजुरी मिळत नाही ; रोहित पवारांचा शिंदेंना टोला

त्यावरून आता आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असताना विदेशातून येणारी गुंतवणूक केवळ गुजरात मध्येच का जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार विदेशातून येणारी कोणतीही गुंतवणूक महाराष्ट्रात वळवण्यात अपयशी ठरत आहे, असं त्यांनी नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेतील मायक्रोन कंपनी सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी गुजरातमध्ये जवळपास २२ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतही आमदार रोहित पवार यांनी गुजरातमध्ये गुंतवणूक येत आहे, याचा आनंद आहे. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक गुंतवणूक प्रत्येक वेळेस गुजरातमध्येच का? महाराष्ट्रात एकही गुंतवणूक का नाही? असा प्रश्न गेल्याच आठवड्यात उपस्थित केला होता.

Rohit Pawar on Modi
Rohit Pawar congratulates CM Shinde : रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचं यासाठी केलं अभिनंदन !

गुजरातच्या निवडणुकीसाठी दीड लाख कोटीची गुंतवणूक असलेल्या वेदांता-फॉक्सकॉन (VEDANTA FOXCONN) प्रकल्पावर महाराष्ट्राने पाणी सोडलं ते नुकसान भरून काढण्याची मायक्रॉनच्या (Micron) माध्यमातून मोठी संधी राज्य सरकारला होती आणि राज्याने पाठपुरावा केला असता तर केंद्रानेही नक्कीच विचार केला असता, असे आमदार पवार यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य सरकार दावोसमध्ये हजारो कोटींचे 'एओयू' केल्याचा दावा करते. त्यानुसार आता सरकारने राज्यातील गुंतवणुकीबाबत मन लावून काम करण्याची गरज असल्याचीही अपेक्षा रोहित पवार यांनी यावेळी केली. पवार म्हणाले, "दावोसमध्ये १६ हजार कोटींचे करार केला असल्याचे आपले सरकार वारंवार सांगते. आता किमान ती गुंतवणूक प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य शासनाने मन लावून काम करायला हवे"

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com