मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha election) मतदानाबाबत तीन आमदारांनी आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदान केले नाही, अशी चर्चा आहे, ती चुकीची आहे. त्यांनी मतदान करताना आघाडीच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले आहे. त्यामुळे खरे जे फुटीर आहेत, त्यांचे संशोधन केले पाहिजे. सध्या मात्र हेल्याला डाव देण्याऐवजी पखालाला दिला जात आहे, ते थांबवावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रतोद व मतमोजणी प्रतिनिधी आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी म्हटले आहे. (Real rebel mla of rajyasabha election voters should search)
माजी मंत्री सुनील तटकरे, आमदार अनिल पाटील आणि संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मतमोजणी प्रतिनिधी होते. त्यांनी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
सध्या सुरु असलेल्या आमदारांच्या मतदानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद, आमदार अनिल पाटील म्हणाले, आमच्यावर प्रामुख्याने जबाबदारी होती की, आपण मतदानासाठी आलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. प्रारंभीच प्रदेशाध्यक्षांना व पोलींग एजंटला दाखवून दिलेली ४२ मते कन्फर्म होती. प्रफुल्ल पटेल यांना ४३ वे मत कोणते व कसे पडले हे देव जाने. आमच्या आघाडीकडून त्यांना ४२ मतेच देण्यात आलेली आहेत.
ते पुढे म्हणाले, आम्ही जे मतदान झाले त्यानुसार ४२ मतेच प्रफुल्ल पटेल यांना दिली गेली होती. एक जादा मत कसे आले याची कल्पना आम्हालाही नाही आणि खासदार पटेल यांना देखील नाही. ज्या तीन आमदारांवर शंका घेतली जाते आहे. त्या आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार संजयमामा शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या सुचने प्रमाणेच मतदान केलेले आहे. त्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे कोड दिले गेले होते. त्या आधारे प्रत्यक्ष मतमोजणी करताना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कशा आहेत, याची खातरजमा झालेली आहे. ते पाहण्याची जबाबदारी आमच्यावर होती.
ते पुढे म्हणाले, मी मतमोजणीला उपस्थित असल्याने वरील तिन्ही आमदारांनी महाविकास आघाडीच्या सुचनेप्रमाणेच मतदान केलेले आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून तसेच पक्षश्रेष्ठींकडून दिलेल्या सुचनांचे त्यांनी पालन केलेले आहे. त्यामुळे याबाबत सध्या या आमदारांच्या मतदानाबाबत जी चर्चा सुरु आहे, ती चुकीची आहे. यामध्ये डाव हेल्याला देण्याऐवजी पखालाला दिला जातो आहे. ते न करता त्यावर संशोधन झाले पाहिजे. खरे जे आमदार आघाडीच्या विरोधात गेलेले असतील त्यावर संशोधन करण्याची गरज आहे. त्यातून निष्कर्ष काढला पाहिजे असे माझे मत आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.