Karjat Municipal Council : एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता उलटणार? भाजपच्या प्रा. राम शिंदेंची खेळी 13 नगरसेवक यशस्वी करणार?

Karjat Municipal Council No-Confidence Motion​: एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत नगरपंचायतीमधील नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात 13 नगरसेवकांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे विश्वास गमावल्याचा ठराव दाखल केल्याने खळबळ उडाली.
No-confidence motion in Karjat​
No-confidence motion in Karjat​Sarkarnama
Published on
Updated on

NCP Sharad Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्ता असलेल्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विश्वास गमावल्याचं पत्र दिलं आहे.

भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबरोबर या 13 नगरसेवकांची काल रात्री उशिरा बैठक झाली. त्यानंतर हे नगरसेवक सहलीवर, तर प्रा. राम शिंदे मुंबईला रवाना झाले. आता या 13 नगरसेवकांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात येत, नगराध्यक्षा राऊत यांच्याविरोधात विश्वास गमवल्याचा पत्र दिलं आहे.

रोहिणी घुले, छाया शेलार, संतोष मेहेत्रे, ज्योती शेळके, सतिष पाटील, लंकाबाई खरात, भास्कर भैमुले, भाऊसाहेब तोरडमल, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, मोहिनी पिसाळ, अश्विनी दळवी, सुवर्णा सुपेकर या नगरसेवकांच्या पत्रावर सह्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या आठ नगरसेवक, तर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा समावेश आहे.

No-confidence motion in Karjat​
Ram Shinde BJP : प्रा. राम शिंदे सभापतीपदाचं मुख्यमंत्र्यांना 'रिटर्न गिफ्ट' देणार; राजकीय भूकंप घडवत रोहित पवारांना होम ग्राऊंडवर झटका?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जत नगरपंचायतीचे कामकाज पाहताना, नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे त्यांनी आमच्या नगरसेवकांचा विश्वास गमावला आहे.

सरकारच्या नियमांचे पालन न करताना, मनमानीपद्धतीने कामकाज चालवतात. नागरी मुलभूत सोयींची मागणी केल्यावर, त्यावर कार्यवाही करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करतात. तसेच नगरपंचायतीच्या वित्तीय आणि कार्यकारी प्रशासनावर व्यवस्थित लक्ष ठेवत नाहीत. त्यामुळे कारभारात अनियमितता आली आहे.

No-confidence motion in Karjat​
Radhakrishna Vikhe Patil : ‘स्थानिक’मध्येही शत प्रतिशत भाजप; मंत्री विखे म्हणाले, 'आता माघार नाही...'

राज्य आणि केंद्राच्या लोकहितार्थ योजना राबवण्यास किंवा त्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यास टाळाटाळ करतात. या सर्व प्रकारामुळे नगराध्यक्षांनी आम्हा नगरसेवकांचा विश्वास गमावला आहे. नगराध्यक्ष पदावरून दूर करण्यासाठी मागणीपत्राद्वारे मागणी करत आहोत. यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी करत असल्याचे या 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पवारांनी राऊतांच्या दुसऱ्या पिढी दिली संधी

नगराध्यक्ष उषा राऊत या कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या सूनबाई आहेत. उषा यांच्या रूपात राऊत यांच्या दुसऱ्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळाली. उषा राऊत या दुसऱ्यांदा नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आल्या.

फेब्रुवारी 2022मध्ये त्यांची कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर निवड झाली होती. कर्जत नगरपंचायतीमध्ये 2022 मध्ये राष्ट्रवादीने 17 पैकी 12 जागा जिंकल्या. काँग्रेसने 3 तर भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत.

राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे मौन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेवर अजूनही राष्ट्रवादीकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. तसेच या बंडखोरीत काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा देखील सहभाग आहे. कर्जत नगरपंचायतीमधील सत्तांतर राज्यातील राजकारणात चर्चेच ठरू लागले आहे.

प्रा. शिंदेंना वचपा घ्यायचाय

भाजप आमदार तथा विधान परिषदेचे प्रा. राम शिंदे यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीला अवघ्या 1243 मतांनी पराभव झाला. प्रा. राम शिंदेंचा तसा सलग दुसरा पराभव आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून हा पराभव होत असल्याचं त्यांना शल्य आहे. शिंदे अन् पवार यांच्यातील हा राजकीय संघर्ष राज्यात चांगलाच घुमतोय. हे दोघं एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी नेहमीच तयार असतात.

प्रा. राम शिंदेंच्या प्रतिक्रियेकडे लक्ष

आता प्रा. राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 पैकी आठ नगरसेवकांना आणि तीन काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्यात यश मिळताना दिसत आहेत. विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर, त्यावर अधिक शिक्कामोर्तब होईल. या सर्व घडामोडीवर प्रा. राम शिंदे यांनी आतापर्यंत, वेळ आल्यावर सविस्तर बोलेल, एवढच सूचक विधान केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com