Jalgaon News: राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली जनसंवाद यात्रा

राऊतझिरा (ता. मुक्ताईनगर) येथे जनसंवाद यात्रेत आमदार अनिल पाटील, ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
Rohini Khadase with NCP workers
Rohini Khadase with NCP workersSarkarnama

मुक्ताईनगर : विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse) यांनी जनसंवाद यात्रेच्या रूपाने फार मोठे पाऊल उचलले असून, या उपक्रमाचा फायदा आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) होईल. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (NCP will face all elections with confident)

Rohini Khadase with NCP workers
Chhagan Bhujbal: राज्यघटना शाबूत ठेवण्याची सर्वांची जबाबदारी!

यावेळी भर पावसात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जमलेली मोठी गर्दी हाच माझ्यासाठी फार मोठा सत्कार आणि सन्मान आहे, असे सांगून आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी वेळेअभावी सत्कार घेणे टाळले. ज्यांच्या शब्दाने निवडून आले. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली.

Rohini Khadase with NCP workers
Ramdas Athawale: माझा पक्ष वाढविण्यासाठी भाजप मला मदत करतो

रोहिणी खडसे यांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून मतदारसंघात संवाद यात्रा सुरू केली असून, या यात्रेची सुरवात बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथे महादेव मंदिरात दर्शन घेऊन केली. ही यात्रा आज राऊतझीझिरा, शेवगा, धोंडखेडा, कुऱ्हा-हरदो अशा चार गावांमध्ये झाली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या आत्याचे निधन झाल्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी पक्षनेते शरद पवार यांनी नाथाभाऊंवर सोपवली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा ‘ग्रीन सिग्नल’ मला श्री. खडसे यांनी दिला म्हणून मी आमदार होऊ शकल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार एकनाथ खडसे यांनी विरोधकांना विकासाची स्पर्धा करण्याचे आवाहन केले.

कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना फक्त जनसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या निवारण कशा करता येतील, या उदात्त हेतूने रोहिणीताईंच्या मनातील जनसंवाद यात्रेस सोमवारी प्रारंभ होत आहे. यात्रेच्या माध्यमातून १८२ गावातील मतदारांशी संपर्क साधला जाईल. संपूर्ण कार्यक्रमांतर्गत नव्याने किमान ३० हजार सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘वन बूथ थर्टी यूथ’ ही संकल्पना राबवून संघटना मजबूत करणे, नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करणे, हा संवाद यात्रेचा उद्देश असल्याचे आमदार खडसे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य तथा युवक रॉष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनीही मनोगत व्यक् केले.

तालुक्यातील १८२ गावात संवाद

रोहिणी खडसे यांनी सांगितले, की मुसळधार पाऊस असूनही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची आणि नागरिकांची गर्दी ही मतदारसंघात परिवर्तनाची लाट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत नक्कीच यात्रेची फलश्रुती दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यात्रेचा समारोप २६ नोव्हेंबरला होणार असून, या कालावधीत ४७ दिवसांत १८२ गावात संवाद साधून समस्या जाणून घेणार असल्याची असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, संदीप पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, मुक्ताईनगर तालुक्याचे तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, यात्राप्रमुख ईश्वर राहाणे, निवृत्ती पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, रावेरचे तालुकाध्यक्ष विशाल कोंडे आदींसह रामभाऊ पाटील, भागवत टिकारे, कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, बी. सी. महाजन, चंद्रकांत पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com