खडसेंच्या उमेदवारीने राष्ट्रवादी करणार गिरीश महाजनांची कोंडी?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी एकनाथ खडसेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
Eknath Khadse News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
Eknath Khadse News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव (Jalgaon) हा भाजपचा (BJP) हे. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या भिंतीने हादरे बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार आहे. या उमेदवारीने भाजप आणि गिरीश महाजन दोघांचीही डोकेदुखी वाढणार असल्याने राष्ट्रवादीकडून एका दगडात दोन पक्षी टिपणार आहे. (NCP will Give a chance for MLC to Eknath Khadse)

Eknath Khadse News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
भाजपने उपेक्षा केलेल्या आमशा पाडवीचे उध्दव ठाकरेंनी सोने केले!

भाजपत्याग करून राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतरही दीड वर्षापासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसेंची विधान परिषदेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचेही नाव राष्ट्रवादीकडून निश्चित आहे.

Eknath Khadse News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
Rajesh Tope : एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य ; टोपेंचं टि्वट

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी ‘मविआ’तील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रत्येकी दोन तर भाजपचे ४ सदस्य सहज निवडून जातील. त्यासाठी प्रत्येक पक्षातील नेते आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.

खडसेंना संधी

राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतरही खडसे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते. या आधीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांचे नाव देण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी ही यादी अद्याप मंजूर केलेली नाही. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीसाठी खडसेंचे नाव निश्चित झाल्याची माहिती राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी 'सकाळ'ला दिली.

भाजपच्या सत्ताकाळात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर खडसेंसह त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. राष्ट्रवादीतही खडसे दुर्लक्षित झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांत आहे. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांची निवड झाल्यास खडसेंना न्याय मिळेल, असे मानले जात आहे.

निवडणुकीत चुरस

राज्यसभेच्या ६ जागांसाठी राज्यात रस्सीखेच सुरू असताना आणि ही निवडणूक बिनविरोध झालेली नसताना, विधान परिषद निवडणूकही बिनविरोध होणार नाही, असे मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com