Eknath Khadse : एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादी सोपवणार मोठी जबाबदारी

Jalgaon News : जळगावमध्ये खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आणखी बळ मिळेल
Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama

NCP : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Eknath Khadse
Ambadas Danve News : नुकसान झाल्याने शेतकरी छाती बडवत आहे, आता पोकळ घोषणा नको..

एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल, हे सर्व गणित पाहता त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse
Balasaheb Thorat News : नगरमध्ये थोरातांच्या वर्चस्वाला विखेंचा सुरुंग; सलग तीन धक्यांमुळे टेन्शन वाढणार?

भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com