धुळे : भाजपच्या राज्यात महागाई गगनाला भिडली आहे. महिलांना रोजचा दिवस कसा ढकलावा याची चिंता आहे. त्यामुळे किमान दिवाळी तरी सुखाने जाऊ दे. भाऊबिजेला ओवाळणी म्हणून तरी खाद्यतेल स्वस्त करा अन् स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर द्या, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP Women`s Wing) शिष्टमंडळाने पंतप्रधानांना भाजपचे माजी मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे (Ex MinisterDr Subhash Bhamre) यांच्यामार्फत दिले.
दिवाळीनिमित्त भाऊबीजेला ओवाळणी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस सिलिंडर, खाद्यतेलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
येथील राम पॅलेसमधील खासदार संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जिल्हा कार्याध्यक्षा मालती पाडवी, जिल्हा कार्याध्यक्षा संजीवनी पाटील, जिल्हा उपाध्यक्षा रश्मी पवार, जिल्हा सरचिटणीस सरोज पवार आदींनी खासदार डॉ. भामरे यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा, दिवाळीत भाऊबीज हा बहीण- भावासाठी महत्त्वाचा सण आहे. बहिणीच्या प्रेमाखातर भाऊ बहिणीला ओवाळणी देत असतो. देशात २०१४ आणि २०१९ मध्ये महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर तुम्ही मतरुपी आशीर्वाद मागायला मतदारांच्या दारात आला होतात. तेव्हा महिला मतदारांनी मतरूपी आशीर्वाद देत भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले. पण सद्यःस्थितीत महागाईने ‘न भूतो न भविष्यती’, असा उच्चांक गाठला आहे. ते भाजपच्या लोकप्रतिनिधींना समजत असेल किंवा नाही याबाबत साशंकताच आहे.
या महागाईत काटकसरीने संसाराचा गाडा ओढणारी गृहिणी पोळली जात आहे. आता डाळी, खाद्यतेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे दिवाळीत पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादामुळे गृहिणींवर दरवाढीची संक्रांत आली आहे. दिवाळीत भाऊबीजेची ओवाळणी म्हणून पंतप्रधान मोदी यांनी खाद्यतेल, डाळ, घरगुती गॅस सिलिंडर, अशा अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावे, त्यात ५० टक्के सवलत द्यावी, जेणेकरून दिवाळी गोड होऊ शकेल, असे राष्ट्रवादीच्या महिला शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.