NCP Crisis News : राष्ट्रवादीच्या फुटीरांनी मतदारांना मुर्ख समजू नये!

जनता शरद पवार यांच्याबोरबरच आहे, परतीचा निर्णय घ्या अन्यथा मतदार योग्य निर्णय करतीलच.
MLA Saroj Ahire & Purshottam Kadlag
MLA Saroj Ahire & Purshottam KadlagSarkarnama

NCP MLA News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर आमदारांनी आज मोठा विनोद केला आहे. अजित पवार यांच्या गटात गेल्याने कोट्यावधींचा निधी मिळाल्याच्या जाहिराती या आमदारांनी केल्या आहेत. दोनच दिवसांत पदभारही न सांभाळलेल्या अर्थमंत्र्यांनी यांना निधी दिला यावर विश्वास ठेवायला जनता मुर्ख नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुरषोत्तम कडलग यांनी केली आहे. (NCP leader Purshottam Kadalag criticised Ajit Pawar Group`s MLA)

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) देवळालीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांच्याविषयी संताप व्यक्त केला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी मानसकन्या म्हणवून सहानुभूती मिळवणाऱ्या अहिरे यांनी खरा रंग दाखवला असे ते म्हणाले.

MLA Saroj Ahire & Purshottam Kadlag
Anil Parab यांनी कायदाच सांगितला, Neelam Gorhe अडचणीत | Shivsena UBT | Disqualification Petition

यासंदर्भात श्री. कडलग म्हणाले, सरोज अहिरे यांनी आपल्याला ४० कोटी मिळाले असे म्हटले आहे. हा मोठा विनोद आहे. ज्यांना संसदीय कार्यपद्धती माहिती आहे, त्यांना हे सर्व कळलेत.मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यावर झालेल्या चर्चेत राज्यभरातील आमदारांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. नियमाप्रामणे त्यांचा समावेष पुरवणी मागण्यात झाला आणि पावसाळी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळाली. त्याचा अजित पवार यांच्या गटाशी दुरान्वयानेही संबंध नाही.

श्री. कडलग म्हणाले, हा निधी जवळपास दोनशे मतदारसंघांसाठी मंजुर झाला आहे. शिरपूरला (धुळे) ५० कोटी, शीरपूर ५५ कोटी, नाशिक मध्य, नाशिक पूर्व अशा सर्वच मतदारंसघात निधी मंजूर झाला आहे. मग हे सगळे लोक उपमुख्यमंत्री अजीत पवार गटात गेले आहेत का?. अगदी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघात देखील निधी मंजूर आहे. तसाच येवल्याला ३६ कोटी, सिन्नरला ४२ तर देवळालीला ४० कोटींचा निधी आहे. निधी मिळाला म्हणजे मतदारांनी वैचारीक बांधीलकी आणि शरद पवार यांच्यावरील प्रेम संपवले असे समजू नका.

MLA Saroj Ahire & Purshottam Kadlag
Aditi Tatkare Lifestyle: कहाणी... आदिती तटकरेंच्या घड्याळाची !

जनतेते जाताना शरद पवार यांचे उमेदवार म्हणून तुम्ही मते मिळवली आहेत. त्यांच्या विचारांशी प्रातारण केल्यास त्याचे परिणाम आगामी काळात दिसतील. निधी आल्यावर आमदारांना काय मिळते? हे लपून राहिलेले नाही. आमदार अहिरे या तर सातत्याने शरद पवार यांची मानसकन्या म्हणून मिरवत होत्या. त्यामुळे त्यांनी मतदारांना गृहीत धरू नये. स्वगृही परतावे, हेच त्यांच्या हिताचे असेल, असा इशारा कडलग यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com