
Aditi Tatkare Lifestyle: आदिती तटकरे.... राजकारणातल्या बड्या घराण्यातल्या... जिल्हा परिषद, आमदारकी, राज्यमंत्री, आता तर थेट कॅबिनेट खातचं वाट्याला आलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे.... आदिती यांच्याभोवतीचं हे राजकीय वलय वाचून, ऐकून आदिती यांचा रुबाबच किती भारी असावा ना ? एवढं सगळं मिळवलेल्या आदिती यांची 'लाइफ स्टाईल' किती ग्लॅमरस असेल ना ? म्हणजे, महागडे, झगमगाटी ड्रेस, त्यावरचं डिझाईन, रोज नवे आकर्षक आणि उंची ब्रँडची घड्याळे, ब्रेसलेट्स, कडं, सोन्याची ट्रेंड्री दागिने... ही सगळी चॉईस आदिती यांचीही असावीच ना ?
पण आदिती या आणि अशा उंची 'लाइफ स्टाईल'पासून कोसो दूर राहतात आणि साधी राहणी पसंत करतात. त्यात, आदिती यांच्या हातातलं घड्याळ पाहिलं; तर तुम्ही आवाक व्हाल ! हे घड्याळ मंत्र्याचं आहे, की एका सामान्य महिलेच्या हातातलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र, आदिती यांच्या खूप साध्या, स्वस्तातल्या आणि नाजूक घड्याळाची कहाणी तितकीच निराळी, आपुलकीची, मायेची आहे ! या घड्याळाचा 'लुक' साधाच आदिती यांचं व्यक्तीमत्त्व केवढ्या साधेपणात दडलयं हेही नजरेपुढं आणतं.
आदितीच्या हातातल्या घड्याळाचं वय आहे 16 वर्षांचं. म्हणजे त्या कॉलेजमध्ये असताना घेतलेल छोटुसं, साधचं, पण एकदम सुंदर घड्याळ आजघडीलाही त्या रोज वापरतात. त्या मागचं कारण म्हणजे त्यांच्या आई-बाबांनी त्यांना घड्याळ भेट दिलं आहे. तेव्हा आदिती कॉलेजमध्ये होत्या. पुढे जिल्हा परिषदेपासून राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्या पुढे गेल्या. नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे महिला व बालविकास खात्याची जबाबदारी आली आहे. आदिती यांनी गेल्या काही काळात दमदार राजकीय वाटचाल केली. तरीही, एवढ्या वर्षांत ‘घड्याळ’ बदलले नाही. (अर्थात, त्यांच्या पक्षाचे चिन्हही घड्याळ आहे.) आदिती यांच्या घड्याळाची डायल अत्यंत छोटे असून, त्याला सिल्व्हर रंगाचा बेल्ट आहे. हे घड्याळ आदिती यांना शोभून दिसते. त्यापलीकडे जाऊन आपण राजकारणी आणि मंत्री आहोत हे विसरून, त्या आई बाबांनी दिलेली ही भेट नेहमी स्वतःकडे ठेवणे पसंत केले आहे.
आपल्या हातातले घड्याळ हे नुसती एक एक्सेसरी नाही, तर संस्कार आणि मूल्यांची शिदोरी असल्याची भावना आदिती मांडतात. आदिती या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री, खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आदिती यांचा पेहराव नेहमीच छाप पाडतोच पण हाच धागा त्यांना सर्वसामान्यांशी ‘कनेक्ट’ करतो.
नवी फॅशन,नवा ट्रेंड, नवी स्टाईल, साडी, ड्रेसच्या रंगासारखेच ‘ मॅचिंग‘ दागिने, महागड्या ब्रॅंड्सच्या घड्याळांना पसंती असते. बदलत्या ट्रेंडनुसार राजकारणातील स्त्रियांच्या पेहराव्यातही बदल होत गेला. पण आदिती तटकरे या अपवाद राहिल्या. सोबर लूक ठेवणाऱ्या आदिती राजकारणात मात्र, तितक्याच साध्या आहेत.
आदिती नेहमीच साध्या ड्रेसमध्ये दिसतात. त्यांच्या ड्रेसची चॉईसही हटकेच.त्या साधारणपणे साध्या कॉटनचे पण सोबर दिसणारे, फिकट रंगाचे ड्रेस पसंत करतात. त्यांच्या या साध्या लुकमुळेच त्यांचं व्यक्तिमत्व सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. त्या राजकारणी, मंत्री असल्या तरी सगळ्यांसोबतच अतिशय आदराने बोलतात. त्यांच्या याचं साधेपणामुळेच सर्व राजकीय पक्षांशी सहजपणे कनेक्ट वाढतं आहे
Edited By - Rashmi Mane