Shekhar Kharmare News : राष्ट्रवादीकडे कार्यकर्तेच कुठे; जम्बो कार्यकारिणी जाहीर करीत भाजपची जहरी टीका

Karjat political news: शेखर खरमरेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर जहरी टीका.
Shekhar Kharmare News : राष्ट्रवादीकडे कार्यकर्तेच कुठे; जम्बो कार्यकारिणी जाहीर करीत भाजपची जहरी टीका
Sarkarnama
Published on
Updated on

कर्जत तालुक्यात भाजपने तालुकापातळीवर जम्बो कार्यकारिणी जाहीर करीत भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर जोरदार टीका केली.

"कर्जत तालुक्यात विरोधी गटाची केविलवाणी स्थिती आहे. त्यांना कार्यकर्तेदेखील मिळत नाही. कार्यकर्ते नाही, तर पदाधिकारी कसे तयार होतील. भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून कर्जत भाजपचे पक्षीय संघटन मजबूत होत आहे. कर्जत तालुक्यातील प्रामाणिक काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. आता कार्यकर्त्यांनी त्या पदाला न्याय द्यावा. यासह पक्षाची ध्येय-धोरणे, वैचारिकतेशी प्रामाणिक राहत संघटनावाढीसाठी प्रयत्न करावे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shekhar Kharmare News : राष्ट्रवादीकडे कार्यकर्तेच कुठे; जम्बो कार्यकारिणी जाहीर करीत भाजपची जहरी टीका
Snehalata Kolhe : अयोध्या सोहळ्यानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवरील फोटोंवरून स्नेहलता कोल्हेंची कार्यकर्त्यांना तंबी, म्हणाल्या...

आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यापासून त्यातच सत्ताबदलानंतर पक्षात नवचैतन्य संचारले आहे. भाजप पक्षापासून लांब गेलेले पुन्हा मित्रपक्षाच्या माध्यमातून जवळ येत सत्तेचा लाभ घेत आहेत. यासह भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांनी विकासकामांद्वारे बाळसे धरत राम शिंदे यांच्याशी जवळीक साधली आहे. याचअनुषंगाने कर्जत तालुक्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदेंच्या गटास समतोल राखला असला तरी आमदार शिंदेसमर्थकांचा भरणा अधिक आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय आठ उपाध्यक्ष, सात चिटणीस, तीन सरचिटणीस, तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये तब्बल ६४ ज्येष्ठ आणि निष्ठावान तरुणांना स्थान देण्यात आले. जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान आघाडीचे सुनील यादव उपस्थित होते.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

उपाध्यक्ष म्हणून युवराज शेळके (कोरेगाव), रमेश अनारसे (अळसुंदे), सुरेश मोढळे (देशमुखवाडी), प्रकाश शिंदे (चापडगाव), संतोष निंबाळकर (पाटेवाडी), संभाजी बोरुडे (कोकणगाव), सुनील काळे (करपडी), समीर जगताप (कुळधरण).

तालुका सरचिटणीस - पप्पू धोदाड, राहुल निंबोरे, दत्तात्रय मुळे यांची व चिटणीस म्हणून संतोष फरांडे, कल्याण नवले, सारंग घोडेस्वार, विष्णू गदादे, मंगेश थोरात, विठ्ठल अनभुले, प्रकाश पठारे यांची निवड करण्यात आली आहे.

महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी प्रतिभा रेणूकर, शहरध्यक्षा आशा वाघ, कर्जत तालुका सोशल मीडियाप्रमुख काकासाहेब पिसाळ, तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून दीपक गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदी नीळकंठ शेळके, कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, शिवाजी काळे (राशीन), संदीप बुद्धिवंत (मिरजगाव), तर ओबीसी कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून अजित अनारसे यांना स्थान देण्यात आले.

पांडुरंग क्षीरसागर (ओबीसी सरचिटणीस), नंदलाल काळदाते (वैद्यकीय आघाडी), भाऊसाहेब गावडे, प्रशांत शिंदे (भटक्या विमुक्त आघाडी), गणेश जंजिरे, उदयसिंग परदेशी (किसान आघाडी), प्रवीण लोंढे (अनुसूचित जाती-जमाती), सुनील पोकळे (सांस्कृतिक आघाडी), अनिल खराडे (कामगार आघाडी), सुहास गावडे (दिव्यांग सेल), फारुक पठाण (अल्पसंख्याक आघाडी) यांना स्थान देण्यात आले आहे.

Edited By : Rashmi Mane

R...

Shekhar Kharmare News : राष्ट्रवादीकडे कार्यकर्तेच कुठे; जम्बो कार्यकारिणी जाहीर करीत भाजपची जहरी टीका
Nilesh Lanke : राणी लंकेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेच्या सांगतेतून आमदार लंकेंचा दूरचं गणित जुळवण्याचा प्रयत्न!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com