आमदार राहुल ढिकले तुम्हीच बाळासाहेब सानप यांच्याकडून काही तरी शिका!

महाविकास आघाडी सरकारला कॉपी करण्याचा सल्ला दिल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टिका.
MLA Rahul Dhikle & Purshottam Kadalag.
MLA Rahul Dhikle & Purshottam Kadalag.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडे बुद्धी, विचार व आचरण स्वातंत्र्य आहे. या सरकारला कॉपी करण्याचा सल्ला देताना आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikle) यांना पत्रक काढतानाच आपण स्वतः कॉपी केली आहे, याचा विसर पडलेला दिसतो. कारण तेच पत्रक त्याच दिवशी राज्यभर भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांच्या नावाने प्रसिद्धीला आलेले आहे, अशी टिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग (Purshottam Kadalag) यांनी केली आहे. (MLA Rahul Dhikle should take lessons from Ex MLA Balasaheb Sanap)

MLA Rahul Dhikle & Purshottam Kadalag.
`एसटी`चे तुघलकी फर्मान; ज्येष्ठांच्या सवलतीचे वय ६५ वर्षे!

यासंदर्भात श्री. कडलग म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कॉपी करावी असं आमदार ढिकले म्हणताय, पण आपण अनेक भाजप नेत्यांनी नाव टाकुन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाची कॉपी गिरवली आहे. पक्षाने प्रत पाठवली आणि तुम्ही रिकाम्या जागेवर नाव टाकुन ते पुढे पाठवले. खरोखरच ओबीसी आरक्षणाची एव्हढी चिंता असती तर किमान त्यात स्वतःची भूमिका तरी मांडली असती.

MLA Rahul Dhikle & Purshottam Kadalag.
सरपंच लीना पाटील यांनी नदीलाही फोडला पाझर!

ते पुढे म्हणाले, ज्या सरकारविषयी तुम्ही शिकवणी लावण्याची भाषा करताय त्या महाविकास आघाडी सरकारच्या आधीच्या सरकारने पाच वर्षात काय केले?. मराठा व ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत काय अध्यादेश काढले?, याचा जरा बारकाईने अभ्यास करा. ईंपेरीकल डाटा केंद्र सरकार का देत नाही ?. केंद्रांत तुमच्या भाजप सरकारचे दोन्ही सभागृहात बहुमत आहे. मग मराठा आरक्षणाचे विधेयक का मांडत नाही?. ह्या बाबींवर आपण भाजपचे आमदार म्हणून पत्रव्यवहार तरी केलात का?.

लोकप्रतीनिधी म्हणुन आपण निवडूण आला आहात. आपणास सर्व घटकांनी मतदान केले. त्यापुर्वी आपण महानगरपालीकेत नगरसेवक होता. या कारकिर्दीत विकासासाठी कोणता मोठा प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न केलात? असा प्रश्न श्री. कडलग यांनी केला.

ज्या महाविकास आघाडीला आपण शिकवणी लावण्यास सांगत आहात, त्या महाविकास आघाडी सरकारने मराठा व ओबीसी आरक्षणासाठीची आवश्यक ती विधेयके मांडली. जे याचीकाकर्ते त्यांवर आक्षेप घेऊन या आरक्षणात खिळ घालण्याचा प्रयत्न करतात त्या यांचीकाकर्त्यांचे करते करविते आणि पडद्यामागचे सुत्रधार कोण ही माहीती जनतेपासून लपलेली नाही. त्यामुळे आपण आधी भाजप नीट समज़ुन घ्या. नाहीतर संघाचे वर्ग करा, असा सल्ला देखील श्री. कडलग यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, ओबीसी नेते हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहू नये यासाठी (स्व.) गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मुलींची आपल्या पक्षात काय स्थिती आहे. एकनाथराव खडसे विरोधी पक्ष नेते होते. संघटनेत आयुष्य वेचून त्यांनी भाजप वाढवली. त्यांना भाजपने उमेदवारी देखील दिली नाही. त्यांच्या मागे `ईडी` ससेमीरा लावला. छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी आवाज उठवला, त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली. दुर कशाला बाळासाहेब सानप यांचेकडून देखील शिकता येण्यासारखे आहे, त्यांच्याकडून काही तरी शिका.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com