Machhindra Sanap News: महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आज होत आहे. भाजपसाठी ही निवडणूक आता केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल केलेल्या अपक्षांना माघारी एवढाच पर्याय शिल्लक राहिला आहे.
भारतीय जनता पक्षाने उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांना संधी दिली होती. त्यांचे नाव देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचा निर्णय घेतला.
नाशिक महापालिकेत महायुती सत्तेत राहण्याचा निर्णय झाला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौर पदाची संधी मिळाली. विलास शिंदे यांना ही लॉटरी लागली होती.
या राजकीय वाटाघाटींमुळे उपमहापौर पदाची संधी हुकलेल्या मच्छिंद्र सानप यांना महापालिका स्थायी समिती सभापतीपदाचे गिफ्ट मिळाले आहे. सोळा सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे नऊ आणि शिवसेना शिंदे पक्षाचे चार असे तेरा सदस्य आहेत. त्यामुळे सानप यांची सभापती पदाची निवडणूक ही केवळ औपचारिकता राहिली आहे.
महापालिका स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने डाव खेळून पाहिला. अपक्ष आणि सध्या राष्ट्रवादीसोबत गट नोंदणी केलेल्या मुकेश शहाणे यांनी सभापती पदासाठी अर्ज भरला होता. या राजकीय खेळीने महायुतीत अस्वस्थता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थायी समिती सभापतीची निवडणूक लढवावी की नाही याबाबतचा निर्णय शेवटपर्यंत वरिष्ठ स्तरावर झाला नाही. मंगळवारी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे याबाबत सूचना करणार होते.
मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया कळविलेली नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता मुकेश शहाणे हे प्रक्रिया सुरू होताच आपली उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. ही राजकीय अपरिहार्यता शहाणे यांच्याही लक्षात आलेली आहे.
भाजपने महापालिका स्थायी समिती निवडणुकीत कोणताही धोका पत्करला नव्हता. स्पष्ट बहुमत हाती असतानाही स्थायी समितीच्या सदस्यांना शहराबाहेर सहलीला पाठविण्यात आले होते. मंगळवारी रात्री हे सदस्य शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापती म्हणून निवड निश्चित मांडली जाते. काही वेळातच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.