आयुक्त म्हणतात, ‘महापालिकेची गंगाजळी वाढू दे’

लक्ष्मीपूजनानिमित्त महापालिका कोषागाराचे पूजन झाले.
Commissioner Chandrakant Pulkundwar
Commissioner Chandrakant PulkundwarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजनानिमित्त (Diwali Festiwal) महापालिकेच्या (NMC) कोशागार कार्यालयात तिजोरीचे पूजन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) व सायली पुलकुंडवार (Sayali Pulkundwar) यांच्या हस्ते करण्यात आले. (Commissioner pulkundwar adoration of NMC vault)

Commissioner Chandrakant Pulkundwar
Mallikarjun Kharge उद्या स्वीकारणार पक्षाध्यक्षपदाचा पदभार

नाशिक महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवनात सोमवारी लक्ष्मीपूजन झाले. त्यानिमित्त कोशागारातील (ट्रेझरी) तिजोरीचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लक्ष्मीपूजन करण्यात आले.

Commissioner Chandrakant Pulkundwar
पंतप्रधानपदी निवड होताच ऋषी सुनक यांना नरेंद्र मोंदीनी दिल्या शुभेच्छा

दीपावलीनिमित्त महापालिकेत ट्रेझरी पूजनाची चांगली प्रथा असल्याचे आयुक्त म्हणाले. ‘लक्ष्मीला प्रार्थना आहे. महापालिकेची गंगाजळी सतत वाढत राहो. जेणेकरून नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा देता येतील. नागरिकांचीही भरभराट होवो. शहरात सौहार्दपूर्ण वातावरण राहो. त्यामुळे शहराचा विकास वेगाने होईल’, अशी भावना व्यक्त केली.

श्रीकांत पुलकुंडवार, कृष्णकांत पुलकुंडवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखा परीक्षक बोधिकिरण सोनकांबळे, उपमुख्य लेखाधिकारी गुलाब गावित, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, दत्तात्रय पुंड, वाल्मीक ठाकरे, अजय कमोद, दादाभाऊ चौरे, हंसराज वर्मा, गोकुळ राऊत, वैभव मोटकरी, अरुण महाले, वसंत माळवे, अरुण बटाटे, विश्वास जोगी, हुसेन पठाण, सागर पिठे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com