Chhagan Bhujbal & Budhha community Politics: छगन भुजबळ जातीपातीचे राजकारण करतात. मराठा आरक्षणावरून तो समाज भुजबळांवर नाराज आहे. शासनाने आरक्षणाबाबत दिलेले अल्टीमेटम उद्या संपत आहे. त्यामुळे त्याचे सावट बुद्ध स्मारकाच्या कार्यक्रमावर पडू नये यासाठी भुजबळ यांनी बुद्ध स्मारकाच्या आवारात बोधिवृक्षाची फांदी लावण्याच्या कार्यक्रमापासून दूर रहावे असा इशारा देण्यात आला आहे. (Vanchit Bahujan Aghadi warns Bhujbal keep away from Programme)
वंचित बहुजन समाज आघाडीने (Vanchit Aghadi) याबाबत राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला आहे. नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या कार्यक्रमावर मराठा आरक्षणाचे सावट असल्याचा दावा त्यांनी केला.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश शिंदे, माजी नगरसेवक संजय साबळे, जितेंद्र शार्दूल, वामनराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेद्वारे भुजबळ यांनी बहुजन समाजाच्या नावावर लुटलेली संपत्ती व मान सन्मान उघड्यावर पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही इशारा दिला आहे.
भुजबळ यांनी नेहमीच जातीपातीचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. मुंबईत २३ नोव्हेंबर १९८७ ला समस्त बहुजन समाज हुतात्मा स्मारकावर जमला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो संपूर्ण परिसर गोमुत्राने स्वच्छ करण्याचे काम भुजबळ यांनी केले होते. यातून त्यांच्या मनात बहुजनांबद्दल काय भावना आहेत, हे स्पष्ट होते.
मंगळवारी (ता.२४) बुद्ध स्मारकाच्या आवारात बोधिवृक्षाची फांदी लावण्याचा कार्यक्रम आहे. त्याचे आयोजक असण्याचा भुजबळ यांना काहीही अधिकार नाही. त्यांनी आधी बहुजन समाजाची माफी मागावी, नंतरच आयोजक हे पद भूषवावे. अन्यथा त्यांना हे पद भूषवू दिले जाणार नाही अशी बहुजन वंचित आघाडीची मागणी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.