आता फक्त मोदींच्या खुर्चीचा लिलाव बाकी आहे!

केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून खासगी कंपनी, ठेकेदारांना पोसण्याचे काम सुरु आहे. \
Medha Patkar
Medha PatkarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : सत्ताधारी प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करीत खासगी कंपनी (Centre doing privatization in all fields) आणि ठेकेदारांना पोसण्याचे काम करत आहे. (They only observing contractors) त्यांच्याकडून केवळ मोदींची खुर्ची लिलावात काढणे बाकी आहे, असे प्रतिपादन नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर (Medha Patkar) यांनी केले.

येथील रोटरी क्लब हॉलमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगार मेळावा झाला. यावेळी कॉम्रेड माधवराव गायकवाड यांना जीवनगौरव, मोहन शर्मा यांना कामगार नेते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

Medha Patkar
परमबीर सिंगांच्या नाशिकमध्ये जमिनी?; सिन्नरला नवा गुन्हा दाखल

मेघा पाटकर म्हणाल्या, की खासगीकरणाच्या मार्गाने सत्ताधाऱ्यांचे सुरू असलेले राजकारण मंजूर नाही. त्यास विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. खासगीकरण करत त्या माध्यमातून राबविण्यात आलेले विविध प्रकल्प त्यातून मिळणारा लाभ स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. खासगी ठेकेदार यांच्या जिवावर २०२६ ची निवडणूक लढवून ती जिंकून येण्याचा त्यांचा उद्देश आहे. भागीदारांचे भले करायचे श्रमिकांची मात्र चिंता नाही, असा त्यांचा अजेंडा आहे. खोटी आश्वासने देत बेरोजगारी निर्माण करणे, त्यांचे कार्य आहे.

Medha Patkar
महाराष्ट्र वीज टंचाईवर करणार `अशी` मात!

त्या पुढे म्हणाल्या, आरोग्य, संरक्षण, वीज, पाणी, रेल्वे अशा विविध विभागांमध्ये खासगीकरणाचे षडयंत्र राबवले जात आहे. त्याचे परिणाम सामान्य नागरिक, श्रमिक वर्ग सोसत आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन टंचाईमुळे दगावलेले खासगीकरणाचे बळी पडण्याचे एक उदाहरण आहे.

महाराष्ट्र सरकारचे कौतुक

आता सत्ताधाऱ्यांकडून खासगीकरणाचा विषाणू शेती क्षेत्रातही घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे बंद पुकारण्यात आला, यासाठी त्यांचेही धन्यवाद देणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी व्ही. डी. धनवटे, कृष्णा भोईर, मिलिंद रानडे, महेश जोतिराव, राजू देसले, एस. आर. खतीब, अरुण म्हस्के, सलाउद्दीन नाकाडे आदी उपस्थित होते.

ब्रम्हगिरी बचावला पाठिंबा

ब्रह्मगिरी बचाव आंदोलनात सक्रिय कार्यकर्ते व ग्रामस्थांना भेटून सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी पाठिंबा दिला. नाशिकला हुतात्मा स्मारकात श्रीमती पाटकर यांनी भेटून पाठिंबा दिला. बेलगाव ढगा (ता. नाशिक) येथील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणासाठी, डोंगर वाचविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव करून सह्याद्री संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, तसेच मातोरी ग्रामस्थांचा सन्मान केला. सह्याद्री पर्वतरांगेचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंचांना अनुकरणीय काम नाशिक येथील ग्रामसभा करीत आहेत. आपले हे कार्य असेच सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com