OBC Reservation : "मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 'सगेसोयरे'च्या अंमलबजावणीसाठी चार तारखेला पु्न्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून राज्य सरकार सावध झाले आहे. तसेच 'सगेसोयरे'बाबत सरकारने निर्णय घेतल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल", असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या दडपशाहीला सरकारने बळी पडू, असा सल्ला देत हल्लाबोल चढवला. "मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. चार तारखेला ते आंदोलन सुरू करत आहेत. 'सगेसोयरे'च्या निर्णयाचा फटका ओबीसी आरक्षणाला बसणार आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या दबावाला सरकारने आता बळी पडू नये. तसे काही झाल्यास ओबीसी (OBC) समाज रस्त्यावर उतरेल", असा इशारा प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ओबीसी समाज त्यांच्या मागण्यांबाबत प्रचंड आक्रमक आहे. त्यांच्यातील खदखद कधी बाहेर येईल हे, सांगता येणार नाही. ओबीसी समाज आक्रमक झाल्यास जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू होतील. सरकारला हे आंदोलन परवडणार नाही. आंदोलनाचा काय परिणाम असेल, हे देखील सांगता येत नाही. तरी त्याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल.
कुणबी आणि मराठा एकच आहे, असा विषय समोर आला आहे. हा मुद्दा पुढे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने निकाली लावला आहे. खत्री कमिशनने (Khatri Commission) देखील कुणबींमध्ये मराठा येत नाही, असा अहवाल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे याबाबत लक्ष वेधणार असून, जो सगेसोयरे विषय चालू आहे, तो तातडीने थांबवण्याची मागणी करणार आहे", असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. OBC leaders warn government as Manoj Jarange will protest
प्रकाश शेंडगे यांनी आमचा ओबीसी बहुजन पक्ष पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला समोरे गेला. आमच्या पक्षाचे 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 13 उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढले. या निवडणुकीला कमी वेळा आणि आर्थिक मदत नसताना समोरे गेल्याचे सांगितले. तसेच विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती लवकरच ठरवून त्यावर कामाला लागणार आहोत, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.