Girish Mahajan Politics: इन्कम टॅक्स इफेक्ट; थोड्याच वेळा शिवसेना उद्धव ठाकरेंचे उपनेते सुनिल बागुल यांचा तीन माजी नगरसेवकांसह भाजप प्रवेश!

Shiv Sena Faces Blow as Bagul Corporators Move to BJP: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दुसरा उपनेता आणि तीन माजी नगरसेवक आज भाजप प्रवेश करण्याची चर्चा.
Sunil Bagul & Mama Rajwade
Sunil Bagul & Mama RajwadeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Vs BJP News: केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्याने हाती आलेल्या आयुधांचा भाजपने नाशिकमध्ये केला आहे. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुनिल बागूल आणि तीन माजी नगरसेवकांचा थोड्याच वेळेत भाजप प्रवेश होत आहे. मात्र या प्रवेशाची जोरदार चर्चा होत आहे.

पूर्वश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक गणेश गीते आणि कमलेश बोडके यांचा आज भाजप प्रवेश होत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकार्याने मुंबईत हा प्रवेश होईल. गणेश गीते यांच्या विषयी स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा प्रचंड विरोध यामुळे प्रवेश लांबणीवर पडला होता.

विशेष म्हणजे प्राप्तिकर विभागाच्या स्क्रुटीनीच्या जाचाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुनिल बागूल यांचा आज भाजप प्रवेश होत आहे. उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते आणि चार दिवसांपूर्वीच नियुक्त केलेले महानगरप्रमुख मामा राजवाडे, तीन नगरसेवकांसह भाजप प्रवेश करणार आहे. हा उद्धव ठाकरे पक्षाला धक्का की भाजपला फायदा हा वादाचा विषय आहे.

Sunil Bagul & Mama Rajwade
Seema Hiray Politics: भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यातील तणाव शिगेला, बडगुजर यांच्यावर केला गंभीर आरोप!

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे आणि सीमा ताजणे हे तीन नगरसेवक तसेच सुनिल बागूल यांचे समर्थक नेते अजय बागूल, शंभु बागूल, बाळासाहेब पाठक, गुलाब भोये, कन्नु ताजने हे पदाधिकारी भाजप प्रवेश करतील. महानगरप्रमुख राजवाडे यांची चार दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली होती. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मावळत्या महापालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ३५ नगरसेवक होते. भारतीय जनता पक्षाचे ६५ नगरसेवक होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील ३१ नगरसेवकांनी आतापर्यंत पक्ष सोडला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात सध्या त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांत खदखद आहे. ही नाराजी लपून राहिलेली नसतानाही पक्षाचे वरीष्ठ नेते मात्र ठाम आहेत.

महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता प्राप्त केली होती. त्यावेळेस या पक्षाचे ३९ नगरसेवक होते. यातील २७ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याचीच पुनरावृत्ती सध्या सुरू आहे.

भारतीय जनता पक्षात सातत्याने होणारे प्रवेश हे आगामी महापालिका निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार याचे संकेत आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला बसण्याचे चिन्ह आहेत. महायुती निवडणुकांना एकत्रित सामोरे जाणार असे भाजप वारंवार सांगत आहे. त्याचवेळी गरज पडल्यास मैत्रीपूर्ण लढती होतील, हे सांगण्यास भाजप नेते विसरत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com