अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, खासदारांना म्हणाले, रेल्वे गाडी सुरु होणार नाही!

मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी यांची स्पष्टोक्ती
Railway officer with Mp Hemant Godse
Railway officer with Mp Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक रोड : रेल्वेला (Railway) महसूल मिळत नसल्याने गोदावरी एक्सप्रेस सुरू करणे सध्या शक्य नाही. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून मार्गदर्शन मागविले जाणार असून, अनेक दिवसांपासून हा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सध्या गोदावरी एक्सप्रेस (Nashik) सुरू करणे परवडणारे नाही, अशी स्पष्टोक्ती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी (Anilkumar Lahoti) यांनी दिली.

Railway officer with Mp Hemant Godse
जयंत पाटील सिद्धार्थ जाधवच्या केसांच्या फुग्यावर हात फिरवतात तेव्हा!

रेल्वेच्या पाहणी दौऱ्यात इगतपुरी येथे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या श्री. लाहोटी यांनी जाणून घेतल्या. खासदार हेमंत गोडसे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे यांच्यासह मुंबई विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Railway officer with Mp Hemant Godse
रेल्वे, विमाने गेली, आता `बीएसएनएल`तरी वाचवा!

प्रवासी संघटनेचे राजेश फोकणे यांनी दररोज प्रवास करणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससंदर्भात विविध समस्या मांडून त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली. मनमाडहून मासिक पासधारक प्रवाशांसाठी पाच रेक बंद होऊन त्या नाशिकला उघडण्यात येत होत्या. पर्यायाने नाशिकहून प्रवास करणाऱ्या अंदाजे पाचशे ते सातशे प्रवाशांना जागा मिळत होती. आता मनमाडवरून रेक उघडून येतात. पर्यायाने मासिक पासधारकांना व नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पंचवटीमध्ये जागा मिळत नाही. पंचवटीमधील आसन व्यवस्था पूर्वीसारखीच करण्यात यावी, शिवाय एसी कोचची संख्या वाढवावी, महिलांच्या कोचची संख्या वाढवण्यात यावी, पंचवटी वेळेत चालवावी यांसह अनेक समस्या प्रवाशांनी मांडल्या.

यासंदर्भात लाहोटी यांनी सांगितले, की ज्या ठिकाणी कमी तिकीट विक्री आहे, त्या ठिकाणचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढता येईल. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विविध रेल्वेस्थानकांच्या समस्यांसंदर्भात लाहोटी यांच्याशी चर्चा केली. इगतपुरी येथील रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com