Nashik News: केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला, या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अहवालाच्या आधारे हा निर्णय झाल्याचे बोलले जाते. मात्र, या निर्णयाने कांदा उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
निर्यात बंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा दिल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत चांदवड येथे महाविकास आघाडीतर्फे चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी भाजप (BJP) हा पक्ष शेतकरी विरोधी असल्याची टीका करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात भाजप विरोधात संतापाची लाट उसळली होती. हे राजकीय वातावरण व शेतकऱ्यांतील संताप कायम आहे.
केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीचा निर्णयाला आज 19 दिवस झाले आहेत. या कालावधीत कांद्याचे दर 40 रुपयांवरून पंधरा रुपयांवर खाली आले आहेत. यामध्ये गेल्या काही दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शंभर कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच संकटात आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही भरपाई मिळालेली नाही. विमा कंपन्यांनी भरपाई देण्यास टाळाटाळ केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी याबाबत सातत्याने निर्यात बंदी उठवण्याची मागणी करून भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.
चांदवड, बागलाण, येवला, सिन्नर, निफाड, कळवण, दिंडोरी या भागात कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या मतदारसंघांमध्ये राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारला समर्थन दिलेले आमदार आहेत. त्यामुळे हे आमदार शेतकऱ्यांसाठी आणि कंद निर्यात बंदी उठविण्यासाठी अपयशी ठरल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदारांनी आता निर्यात बंदीचा चांगलाच धसका घेतला असून या प्रश्नामुळे भाजपचे आमदार अस्वस्थ आहेत.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.