Nashik Onion Issue in Cabinet: नाफेडच्या घोषणेमुळे राज्यातील कांद्याचे दर कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. त्यानंतर प्रशासन देखील सक्रीय झाले.
यासंदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भारणे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कांद्याचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. निर्यात बंदी उठविल्याने अथवा वाढल्याने दरावर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा त्यांनी केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केंद्रीय पणन मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. निर्यात शुल्क वाढविणे व अन्य प्रस्ताव तातडीने केंद्राला पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यानंतर कांदा उत्पादकांसाठी प्रशासन सक्रिय झाले.
राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. दत्तात्रय भारणे आणि पणन जयकुमार रावल या मंत्र्यांसह विविध अधिकारी व समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नाफेडने चुकीच्या वेळी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोणतीही स्थिती नसताना अफवांवर विश्वास ठेवून घोषणा केली.
नाफेडने देशांतर्गत बाजारपेठेत कांदा विक्रीची घोषणा केली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडले. या अफवांवर विश्वास ठेवून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी काम केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. या प्रश्नावर शेतकऱ्यांचे आंदोलन झाले.
नाफेडच्या अधिकाऱ्यांनी राज्यात काम करताना मन मानेल तसे काम करू नये. राज्यात कृषी विभाग आणि अन्य यंत्रणाची समन्वय ठेवूनच काम केले पाहिजे. मनमानी कशी करता? या शब्दात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना झापले.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री भारणे आणि छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. पुन्हा निर्यात सुरू केल्याने कांद्याचे दर व अन्य स्थितीत कोणताही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळेल, हे पटवून देण्यात आले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने केंद्रीय पणन मंत्री गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रशासनाला याबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाला पाठविण्याच्या सूचना केल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीसह प्रशासन कांदा प्रश्नावर चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.